मुंबई ते दिल्लीपर्यंत पावसाचा धुमाकूळ, कुठे पाणी तुंबले, तर कुठे झाडं पडली; मान्सून सक्रिय होताच दाणादाण

शनिवारी सुरू झालेल्या पावसाने मुंबई, ठाण्यातच नव्हे तर दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातही धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ होत आहे.

मुंबई ते दिल्लीपर्यंत पावसाचा धुमाकूळ, कुठे पाणी तुंबले, तर कुठे झाडं पडली; मान्सून सक्रिय होताच दाणादाण
mumbai rainImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 7:06 AM

मुंबई : राज्यासह देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात तर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आज पहाटेही पावसाने मुंबई आणि ठाण्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई-ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी झाडे पडली आहेत. मुंबई-ठाण्यात जी परिस्थिती आहे, तिच परिस्थिती दिल्लीतही आहे. दिल्लीलाही पावसाने झोडपलं असून त्यामुळे दिल्लीत अनेक भागात पाणीच पाणी झालं आहे.

मुंबई, ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात आज पहाटेच पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे 3.30 वाजताच पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी वृक्षही कोसळले आहे. पहाटेच पावसाने धुमाकूळ घातल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची पुरती धांदलच उडाली. चाकरमान्यांना छत्री आणि रेनकोट घेऊनच घराबाहेर पडावं लागलं. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना कामावर जाताना पावसाचा सामना करावा लागला.

हे सुद्धा वाचा

38 ठिकाणी झाडे पडली

शनिवारपासून मुंबई-ठाण्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे काल मुंबईत शहरात 11, पश्चिम उपनगरात 17 आणि पूर्व उपनगरात 10 अशा एकूण 38 ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडल्या. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या फांद्या तात्काळ हटवल्या आहेत. मुंबईत 7 ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तर यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच मुंबईत काल दिवसभरात चार ठिकाणी घर आणि इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.

अकोल्यात रिमझिम

मुंबई, ठाण्यातच नाही तर अकोल्यातही सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून अकोल्यात पावसाला सुरुवात झाली आहे. अकोल्यात सर्वदूर पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे बळी राजा सुखावला आहे.

हिंगोलीतही जोरदार सरी

हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आजही काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने शेतकरी पेरणी योग्य पावसाची वाट बघत आहेत. मात्र कालपासून पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील उकाडा कमी झालाय.

दिल्लीत पाणी तुंबले

दिल्लीतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिल्ली-एनसीआरच्या रस्त्यावर पाणीच पाणी तुंबले आहे. त्यामुळे दिल्लीतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर हायवेही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. दिल्लीत अनेक भागात पाणी साचल्याने लोकांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे दिल्लीकर चांगलेच वैतागले आहेत.

हिमाचलमध्ये पुराचा धोका, उत्तराखंडमध्ये दाणादाण

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातवारण निर्माण झालं आहे. शिमलाच्या रामपूरमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे शेतातील पिकं वाया गेली आहेत. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथे पावसामुळे सोनप्रयाग केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. त्यााशिवाय डेहराडून, नैनीताल, चंपावत, पिथौरगड, बागेश्वर, टिहरी आणि पौडी येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचलला पुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चंबा, कांगडा, कुल्लू, शिमला, सिरमौर आणि मंडी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यता आली आहे.

शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.