AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindustani Bhau Arrested | हिंदुस्तानी भाऊला अटक, धारावी पोलिसांची कारवाई, कोर्टासमोर हजर करण्याची शक्यता

धारावी येथे विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला अटक करण्यात आलंय. धारावी पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Hindustani Bhau Arrested | हिंदुस्तानी भाऊला अटक, धारावी पोलिसांची कारवाई, कोर्टासमोर हजर करण्याची शक्यता
hindustani bhau arrest
| Updated on: Feb 01, 2022 | 8:16 AM
Share

मुंबई : धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला (Hindustani Bhau) अटक करण्यात आलंय. धारावी पोलिसांनी ही कारवाई केलीय. विद्यार्थ्यांना (Student Protest) चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर आता भाऊला सकाळी दहा वाजता बांद्रा न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. 31 जानेवारी रोजी धारावी परिसरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ऑनलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊवर आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी हिंदुस्तानी भाऊ हजर होता. तसा एक व्हिडीओ समोर आला होता. विद्यार्थ्य़ांना ऑफलाईन परीक्षा (Exams) देण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्यावर ही अटकेची कारवाई केली आहे.

आगावीची कुमक मागवली, पोलीस बंदोबस्त वाढवला 

हिंदुस्तानी भाऊवर वेगवेगळ्या कलमांतर्गत धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलीस ठाण्यात आणलं. भल्या पहाटे त्याला नायर रुग्णलयातदेखील तपासणीसठी नेण्यात आलं होतं.  त्यानंतर आता पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. पोलीस अधिकारी आल्यानंतर भाऊला कोणत्या कोर्टासमोर हजर करावे यावर निर्णय घेतला जाणार आहे. 31 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनात काही असामजिक तत्वे तसेच गावगुंड सामील झाले होते. त्यामुळे ते आंदोलन चिघळले. आंदोलन चिघळल्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ :

नेमकं प्रकरण काय आहे ?

31 जानेवारी रोजी धारावी नाईंटी फिट रोडवर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ रस्त्यावर मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात म्हणून धारावी परिसर दणाणून सोडला होता.

इतर बातम्या :

मुंबईत शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळ, शेकडो विद्यार्थ्यांचा गायकवाडांच्या घराला घेराव, सरकारला घामटा

मुंबईत शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळ, शेकडो विद्यार्थ्यांचा गायकवाडांच्या घराला घेराव, सरकारला घामटा

Students Agitation : जे भल्या भल्या नेत्यांना, अभिनेत्यांना जमत नाही ते हिंदुस्थानी भाऊने कसे करुन दाखवलं? कसे जमा केले विद्यार्थी?

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....