मुंबईतही अवघ्या 15 दिवसात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणार, काम सुरु

महाराष्ट्र सरकार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात 1000 खाटांचे 'कोविड-19' रुग्णालय उभारत आहे. हे रुग्णालय ऑक्सिजन आणि मॉनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे.

मुंबईतही अवघ्या 15 दिवसात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणार, काम सुरु

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला (Hospital For COVID-19 Patients) आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी चीनने वुहानमध्ये ज्याप्रकारे 10 दिवसात 1,000 खाटांचं ‘कोविड-19’ रुग्णालय युद्धपातळीवर उभारले होते. तसेच, रुग्णालय मुंबईतही (Hospital For COVID-19 Patients) उभारले जात आहे.

महाराष्ट्र सरकार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात 1,000 खाटांचे ‘कोविड-19’ रुग्णालय उभारत आहे. हे रुग्णालय ऑक्सिजन आणि मॉनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे. पुढील 15 दिवसांत हे रुग्णालय युद्धपातळीवर उभारले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष टीम तयार करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी युद्धपातळीवर सुरु असलेल्या या रुग्णालयाच्या कामाची (Hospital For COVID-19 Patients) पहाणी केली.

ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली एमएमआरडीए संयुक्तपणे या 1000 खाटांच्या रुग्णालयाची निर्मीती करत आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडावर उभारल्या जात असलेल्या या ‘कोविड-19’ रुग्णालयाच्या कामाची पाहाणी केली. अंदाजे पुढील 15 दिवसांत हे रुग्णालय उभे राहणार आहे. त्यापैकी काही भाग हा येत्या 8 दिवसांत सुरु करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.

वुहानमध्ये 10 दिवसांत नवं रुग्णालय

कोरोना विषाणूचं जन्मस्थान असलेल्या चीनमधील वुहानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात केवळ 10 दिवसांच्या कालावधीत नवं रुग्णालय उभारण्यात आलं होतं. 25,000 चौरस मीटरच्या या रुग्णालयात 1,000 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता चीनने फेब्रुवारी महिन्यात युद्ध पातळीवर काम करत हे रुग्णालय उभारलं (Hospital For COVID-19 Patients) होतं.

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्याचा मृत्यूदर काही केल्या घटेना, देशात सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात

मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त

Lockdown – 3 : ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी

पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने रांगा, मूळगावी जाण्यासाठी भर उन्हात गर्दी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI