कोरोना विषाणू रोखण्यासाठी चीनची युद्ध पातळीवर तयारी, अवघ्या 10 दिवसात 1000 बेडचं नवं रुग्णालय

चीन कोरोना विषाणूने (व्हायरस) बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ 10 दिवसांच्या कालावधीत नवं रुग्णालय उभारत आहे (Hospital for corona virus victims).

Hospital for corona virus victims, कोरोना विषाणू रोखण्यासाठी चीनची युद्ध पातळीवर तयारी, अवघ्या 10 दिवसात 1000 बेडचं नवं रुग्णालय

बीजिंग : चीन कोरोना विषाणूने (व्हायरस) बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ 10 दिवसांच्या कालावधीत नवं रुग्णालय उभारत आहे (Hospital for corona virus victims). या रुग्णालयाच्या बांधकामाला गुरुवारी (23 जानेवारी) सुरुवात झाली. 3 फेब्रुवारीला हे अद्ययावत रुग्णालय सुरु होईल. आत्तापर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोकांना याची बाधा झाली आहे. त्यामुळे चीनने युद्ध पातळीवर यावर काम सुरु केले आहे (Hospital for corona virus victims).

चीनसह जगभरात कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. मात्र, सध्या तरी वुहान शहर कोरोना व्हायरसच्या केंद्रस्थानी आहे. म्हणूनच चीनने या व्हायरसवर स्वतंत्रपणे तात्काळ उपचार होण्यासाठी युद्ध पातळीवर रुग्णालय उभारणीचं काम सुरु केलं. 25,000 चौरस मीटरच्या या रुग्णालयात 1,000 बेडची व्यवस्था असणार आहे. हे रुग्णालय 3 फेब्रुवारीला बांधून पूर्ण होईल, अशी माहिती चीनने दिली आहे.


वुहानमधील या रुग्णालयाच्या बांधकामासाठी शहरातील रस्ते, मॉल आणि इतर सार्वजनिक ठिकाणं लवकर बंद केली जात आहेत. रुग्णालयाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री वुहान शहरात जमा करण्यात आली आहे. यासाठी शेकडो कामगार दिवसरात्र काम करत आहेत. हे काम पहिल्या 6 दिवसांमध्येच पूर्ण केले जाईल, मात्र, वैद्यकीय यंत्रणा बसवणे आणि इतर कामांसाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील. अशा पद्धतीने 3 फेब्रुवारीपर्यंत हे अद्ययावत रुग्णालय सुरु होईल.

सार्वजनिक ठिकाणी फिरताना प्रत्येकाला मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. चीनमधील अनेक रेल्वे स्टेशन, विमानतळ, सबवे बंद करण्यात आले आहेत. चीनची राजधानी बीजिंगमधील अनेक मोठे सार्वजनिक कार्यक्रम अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. बीजिंगमधील शांघाय डिस्नीलँड आणि इतर काही पर्यटनस्थळं देखील सुरक्षेच्या कारणास्थव बंद ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, चीनमध्ये आत्तापर्यंत कोरोना व्हायरसने 26 जणांचा मृत्यू झाला असून 830 रुग्ण या व्हायरसने बाधीत आहेत, अशी माहिती चीन प्रशासनाने दिली आहे. वुहानमधील हे रुग्णालय बीजिंगमधील रुग्णालयाच्या धर्तीवर बांधण्यात येत आहे. बीजिंगमध्ये 2003 मध्ये सार्स (SARC) कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर 7 दिवसांमध्ये हे रुग्णालय बांधण्यात आलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *