Loudspeaker Mosque : मुंबईत किती मशिदींनी सुप्रीम कोर्टाचा आदेश तोडला? गृहमंत्रालयाकडून आकडेवारी जारी, कारवाई होणार

मनसेने मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केल्याने पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच दरम्यान मुंबईतील किती मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले याची आकडेवारी गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Loudspeaker Mosque : मुंबईत किती मशिदींनी सुप्रीम कोर्टाचा आदेश तोडला? गृहमंत्रालयाकडून आकडेवारी जारी, कारवाई होणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 1:13 PM

मुंबई : मशिदींवरील (Mosques) अनधिकृत भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी मनसेकडून (mns) करण्यात आली आणि पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. मनसेने मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जर तीन मेपर्यंत मशिदीवरील भोंग हटवण्यात आले नाहीत तर चार मेपासून आंदोलन करू असा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत (mumbai) एकूण किती मशिदी आहेत, आणी त्यातील किती मशिदींकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघ झाले आहे याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण 1,140 मशिदी असून, त्यातील 135 मशिदी या सकाळी सहा वाजेच्या आधी नमाजासाठी लाऊडस्पीकरचा वापर  करत असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या काळात लाऊडस्पीक अथवा भोंग्याचा वापर करण्यास मज्जाव आहे. मात्र मुंबईतील 135 मशिदीकडून या नियमांचे उल्लंघ होत असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

‘त्या’ मशिदींवर कारवाई होणार

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये एकूण 1,140 मशिदी असून, त्यातील 135 मशिदी या सकाळी सहा वाजेच्या आधी नमाजासाठी लाऊडस्पीकरचा वापर करतात. मात्र सुप्रिम कोर्टाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगा, लाऊडस्पीक यांचा वापर करण्यास बंदी आहे. या मशिदीकडून नियमांचे उल्लंघ होत असल्याने संबंधित मशिदीवर योग्य ती करावाई करण्यात येईल असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. सध्या राज्यात मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा चांगलाच तापला असून, मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

मनसेचे राज्यभरात आंदोलन

दरम्यान मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत या मागणीसाठी आज राज्यभरात मनसेच्या वतीने आंदोलन सुरू आहे.  अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा लावण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, अनेक शहरांमध्ये मनसे कार्यकर्त्यांची धडपकड सुरू आहे. नाशिकमध्ये तर चौदा मनसे कार्यकर्त्यांविरोधात तडीपारीची नोटीस काढण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.