AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित ठाकरेच्या लग्नाची मला पत्रिकाच दिली नाही, जानकर नाराज

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे याचा मुंबईत अत्यंत शाही विवाहसोहळा पार पडला. कला, क्रीडा, राजकारण, उद्योग इत्यादी नाना क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत, अमित आणि मिताली या जोडप्याला आशीर्वाद दिले. मात्र, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांना निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आळले असून, त्याबाबत जानकर […]

अमित ठाकरेच्या लग्नाची मला पत्रिकाच दिली नाही, जानकर नाराज
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
Share

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे याचा मुंबईत अत्यंत शाही विवाहसोहळा पार पडला. कला, क्रीडा, राजकारण, उद्योग इत्यादी नाना क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत, अमित आणि मिताली या जोडप्याला आशीर्वाद दिले. मात्र, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांना निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आळले असून, त्याबाबत जानकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

अमित ठाकरेच्या लग्नाबद्दल मला माहितीच नाही. मला पत्रिका मिळाली की, मी शुभेच्छा द्यायला जाईन, असे म्हणत महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमित ठाकरेंचा शाही विवाहसोहळा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण विवाहबद्ध झाले. यांचा विवाहसोहळा लोअर परेल येथील सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो

या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अमितच्या लग्नाला हजर होते. त्यामुळे लग्नसोहळ्यात ठाकरे कुटुंबीयांचे राजकारणापलिकडचे सहृदयी नातेही पाहायला मिळाले. किंबहुना, उद्धव ठाकरेंची उपस्थिती सर्वांच्याच चर्चेचा विषय होता.

अमित ठाकरेच्या लग्नाची संपूर्ण बातमी : अमित-मिताली विवाहबद्ध, दिग्गजांची उपस्थिती

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...