शिवसेनेचा आणखी एक नेता रडारवर, दोन दिवसात घोटाळा बाहेर काढणार; सोमय्यांचं ट्विट

शिवसेनेचा आणखी एक नेता रडारवर, दोन दिवसात घोटाळा बाहेर काढणार; सोमय्यांचं ट्विट
किरीट सोमय्या, भाजप नेते

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांना वन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी शिवसेनेमागचं शुक्ल काष्ठ अजून संपलेलं नाही. (i will expose shiv sena leaders scam within two days says kirit somaiya)

भीमराव गवळी

|

Mar 01, 2021 | 11:40 AM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांना वन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी शिवसेनेमागचं शुक्ल काष्ठ अजून संपलेलं नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं ट्विट केलं आहे. सोमय्या यांच्या या ट्विटने एकच खळबळ उडाली असून भाजपच्या रडारवरील हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे. (i will expose shiv sena leaders scam within two days says kirit somaiya)

वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी अत्यंत सूचक ट्विट केलं आहे. संजय राठोड गेले. आता दोन दिवसात मी पुराव्यांसह शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार आहे, असं ट्विट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या यांनी या ट्विटमध्ये कोणत्या शिवसेना नेत्याचा पर्दाफाश करणार त्याचा उल्लेख केलेला नाही. तसेच शिवसेनेचा हा नेता मुंबई, ठाण्यातील आहे की इतर कोणत्या जिल्ह्यातील आहे याचीही वाच्यता केलेली नाही. त्यामुळे सोमय्या यांच्या रडारवर असलेला हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे. सोमय्या यांनी हे ट्विट करताना त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टॅग केलं आहे. त्यामुळे दोन दिवसात सोमय्या कोणत्या नेत्याचा पर्दाफाश करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोमय्यांच्या रडारवरील सेना नेते

यापूर्वी सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री रवींद्र वायकर, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरही सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आता शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार असल्याचं सांगून शिवसेनेच्या तंबूत खळबळ उडवून दिली आहे.

राठोडांचा राजीनामा

दरम्यान, टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरू नये आणि अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी ठाकरे सरकारने राठोड यांचा राजीनामा घेतला. मात्र, आता सोमय्या शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार असल्याने हा मुद्दाही अधिवेशनात गाजणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. (i will expose shiv sena leaders scam within two days says kirit somaiya)

संबंधित बातम्या:

आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने जात आहोत का?; काँग्रेसची सायकल रॅली

मोदी फारच सरळमार्गी नेते, ते आता काँग्रेसच्या मार्गावर चाललेत: संजय राऊत

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, 25 जणांना कोरोनाची लागण; एकही आमदार पॉझिटिव्ह नाही

(i will expose shiv sena leaders scam within two days says kirit somaiya)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें