VIDEO: खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत

महात्मा गांधींच्या भूमिकेवर आम्हीही टीका केली. पण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान आणि कार्य मोठं आहे. बलाढ्य ब्रिटिश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधींनी केलं आहे. गांधींचं नेतृत्व धैर्यशील आणि असामान्य आहे.

VIDEO: खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत
खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 2:23 PM

मुंबई: महात्मा गांधींच्या (mahatma gandhi) भूमिकेवर आम्हीही टीका केली. पण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान आणि कार्य मोठं आहे. बलाढ्य ब्रिटिश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधींनी केलं आहे. गांधींचं नेतृत्व धैर्यशील आणि असामान्य आहे. गांधीजींना गोळी झाडण्यात आली. पण गांधी मेले नाहीत. तुम्हाला गोळी झाडायचीच होती तर पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मोहम्मद अली जिनांवर (Muhammad Ali Jinnah) गोळी का झाडली नाही. गोडसे खरा हिंदुत्ववादी असता, मर्द असता तर गांधींवर गोळी झाडली नसती, असं मत शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केलं आहे. गोडसेने गांधींऐवजी जिनांना गोळी घातली असती तर ती देशभक्ती ठरली असती. गांधींच्या हत्येला एवढी वर्ष उलटली आहेत. पण आजही देश शोकसागरात बुडालेला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नथुराम गोडसेच्या कृत्यावर आपली भूमिका व्यक्त केली. कोणी खरा हिंदुत्वावादी असता त्याने जिनांना गोळी घातली असती. त्याने गांधींना गोळी घातली नसती. गांधींना का मारलं असतं? जिनाने पाकिस्तानची मागणी केली होती. त्यांनीच देशाची फाळणी घडवून आणली. ज्यांनी पाकिस्तानची मागणी केली त्यांना गोळी घालायला हवी होती. तुमच्यात हिंमत होती तर जिनांना गोळी घालायला हवी होती. एका फकिराला गोळी मारणं योग्य नव्हतं, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेला घाबरले

उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या सात उमेदवारांचे नामांकन अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आले आहेत. आम्ही कागदपत्रं दिले होते. त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केलाय. आमच्याकडे त्याबाबत पुरावे आहेत. आमचे उमेदवार 3 वाजण्याच्या आधी पोहोचले होते. तरी देखील नामांकन अर्ज रद्द करण्यात आले आहेत. डीएम ऐकत नाही. दबावात काम करत आहेत. ते शिवसेनेला घाबरले आहेत. ही लोकशाही नाहीये. याबाबत आम्ही आवाज उठवणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

निवडणूक आयोगाकडे मागणी करू

मी दिल्लीत जाणार आहे. निवडणुक आयोगाकडे आम्ही ही मागणी करू. निवडणुका निरपेक्ष व्हायला हव्यात. पण आम्ही लढवत असल्याने त्यांना भीती आहे. आम्ही पश्चिम उत्तर प्रदेशातून निवडणुक लढतोय. नोएडा, बिजनौरमधील अर्ज रद्द केलेत. गुड्डू पंडित यांचा अर्ज रद्द केला आहे, असं ते म्हणाले. गोव्यात प्रमोद सावंत यांच्याबाबतही तेच झालं. कुणाला तरी आमची भीती वाटतेय. आमचे अर्ज रद्द करण्यात आलेत, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

तर सोमय्यांनी वायनरी ताब्यात घेऊन चालवावी, सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?: राऊत

संजय राऊतांची वाईन व्यवसायात गुंतवणूक, बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Nagpur Crime | वेकोलीचा व्यवस्थापक सीबीआयच्या जाळ्यात; कंत्राटदाराकडून कशासाठी मागितली लाच?

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.