Ketaki Chitale: केतकी चितळे प्रकरणात आता पुढील तपास तिच्या लॅपटॉपच्या माध्यमातून होणार, सायबर सेलचीही घेणार मदत, मोटो तपासण्याचा होणार प्रयत्न

Ketaki Chitale: केतकी चितळे प्रकरणात आता पुढील तपास तिच्या लॅपटॉपच्या माध्यमातून होणार, सायबर सेलचीही घेणार मदत, मोटो तपासण्याचा होणार प्रयत्न
Ketaki cyber cell

या प्रकरणात आता सायबर सेलचीही मदत घेण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस आज दुपारी तिच्या कळंबोलीच्या घरी पोहचले आणि त्यांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली. आता या प्रकरणात केतकीच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या तपासात आणखी काय बाहेर येणार, याची उत्सुकता असेल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

May 16, 2022 | 7:38 PM

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी (facebook post)केतकी चितळे (ketaki Chitale)हिच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. आज तिच्या कळंबोलीतील घरातून पोलिसांनी लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. त्यात तिचे तीन मोबाईलही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात आता सायबर सेलचीही मदत घेण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस आज दुपारी तिच्या कळंबोलीच्या घरी पोहचले आणि त्यांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली. आता या प्रकरणात केतकीच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या तपासात आणखी काय बाहेर येणार, याची उत्सुकता असेल.

मोटो तपासण्यासाठी सायबर सेलची घेणार मदत

या प्रकरणी तपासासाठी प्रामुख्याने तीन टीम तयार करण्यात आल्या असून, सायबर सेलच्या माध्यमातून आता पुढील तपास करणार असल्याचं गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. ही पोस्ट केतकीने कधी केली, त्यामागे काही मोटो होता का,. याचा शोध आता सायबर सेल आणि पोलीस घेत आहेत.

अडचणीत वाढ होणार?

केतकी चितळे हिच्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, त्यानंतर तिला या प्रकरणी ताब्यात घेतले गेले. कोर्टात तिला हजर केल्यानंतर तिला चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी केतकीने कोर्टात स्वताच युक्तीवाद केला आहे. वकील न घेतल्यानेही तिच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

राजकीय पडसाद सुरुच

दरम्यान या प्रकरणाला तीन दिवस उलटून गेले तरी त्याचे राजकीय पडसाद मात्र अद्यापही उनटत आहेत. आज माजी मंत्री सदाभाऊ खोत हे केतकीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. तिच्या पोस्टचा अभिमान असल्याचे वक्तव्य त्यांनी आधी केले होते, त्यानंतर त्यावर सारवासारव करत, ती कोर्टात एकटी लढते आहे, त्यामुळे ती कणखर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात तिच्यावर हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर आज दिवसभर राषट्रवादीच्या नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें