AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : पावसाचा मोठा इशारा, पुढील 25 तास धोक्यात, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

Maharashtra Weather Update : पावसाचा मोठा इशारा, पुढील 25 तास धोक्यात, तब्बल इतक्या जिल्ह्यात..
Rain
| Updated on: Aug 06, 2026 | 7:14 AM
Share

राज्यात पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज असतानाच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा, पुणे आणि रायगडच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राजस्थानमधील श्रीगंगानगर शाहजहानपूर, बंकुरा, ईशान्य भारतातील मिझोरामपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. कर्नाटकमध्ये 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. रत्नागिरी, ठाणे, नाशिक, कोल्हापूर जिल्हाच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही भागात पाऊस हजेरी लावेल. यासोबतच मुंबईतही आज पाऊस असेल. काही भागात रात्रभर मुंबईत पाऊस कोसळत आहे. सकाळीही पाऊस सुरू होता. दमदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे.

संततधार पाऊस काही भागात कोसळत असल्याने पिकांना अधिक फायदा होत आहे. यासोबतच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. धरणामधील पाणी पातळीत मोठी वाढ झाली. पुढील दोन दिवस राज्यात पाऊस कायम राहिल. मुंबईतील पाणीसाठा त्याच्या एकूण क्षमतेच्या सुमारे 88.93 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास धरणे भरली आहेत. ज्यामुळे पिण्याचे पाण्याचे संकट मिटल्याचे दिसतंय.

भंडारा शहरासह जिह्यातील ग्रामीण भागात पावसानं चांगलीचं हजेरी लावली. काल आणि आज दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला असून भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला आज ग्रीन अलर्ट दिलेला असतानाही भांसारसह लाखनी, साकोली, तुमसर, मोहाडी तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 250 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पिण्याच्या पाण्याची चिंता अद्याप कायम आहे. जिल्ह्यात अनेक भागांत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला दमदार आणि सलग पाऊस अद्याप झालेला नाही. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी तो समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!