AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीच्या मोर्चात महिलांशी गैरवर्तन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील अभूतपूर्व मोर्चात महिलांशी गैरवर्तन झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हा मोर्चा रोखण्यासाठी मोदी सरकारने प्रचंड सुरक्षा दल तैनात केले होते. बंदुकांच्या बळावर खासदारांना थांबवून राहुल गांधींना रात्री उशिरा सोडून देण्यात आले.

इंडिया आघाडीच्या मोर्चात महिलांशी गैरवर्तन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 11:12 AM
Share

इंडिया आघाडीचा कालचा मोर्चा अभूतपूर्व होता. हा मोर्चा अडवण्यासाठी मोदी सरकारने मोठा फौजफाटा तैनात केला होता. मोर्चेकऱ्यांना अटकाव केला जात होता. पण आता ठिणगी पडली आहे. ही ठिणगी देशभर पसरणार आहे, असं सांगतानाच कालच्या मोर्चात महिलांशी गैरवर्तन करण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा आरोप केला आहे.

निवडणूक आयोगापर्यंत आमचा मोर्चा निघाला. हा मोर्चा अभूतपूर्व होता. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात अनेक पक्ष काल रस्त्यावर उतरले होते. बॉर्डर सेक्युरिटी फोर्स ज्यांचं काम देशाच्या सीमांचं रक्षण करणं आहे, पण कालच्या मोर्चासाठी बॉर्डर सेक्युरीटी फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते. आम्हाला रोखण्यासाठी सीआरपीएफचे जवानही होते. काल दीड लाख पोलीस तैनात होते. जणू पावणे तीनशे खासदार अतिरेकी आहेत, अशा पद्धतीने हा लवाजमा तैनात होता. हे दुर्देव आहे, असं संजय राऊत म्हणाले.

बंदूकीच्या बळावर रोखलं

आमचा मोर्चा आयोगापर्यंत जाऊ दिला असता, आयोगाला भेटू दिलं असतं तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयुक्त खासदारांना भेटत नाहीत, मग काय मोदी शाहांना भेटणार? चोर लफंग्यांना भेटणार? बंदूकांच्या बळावर मोदींनी खासदारांना रोखलं. अटक केली. महिला खासदारांशी गैरवर्तन झालं. रात्री साडे अकरा वाजता राहुल गांधींची सुटका झाली, असं राऊत यांनी सांगितलं.

आता आंदोलन थांबणार नाही

आता हे आंदोलन थांबणार नाही. देशभरात ठिणगी पेटली आहे. आजही दिल्लीत आंदोलन होईल. राहुल गांधी तयारी करत आहेत. नियोजित कामामुळे आम्हाला मुंबईत यावं लागलं. आम्ही परत दिल्लीत जाऊ. पण आता ज्ञानेश कुमार यांना जावं लागेल. अमित शाह कुठे आहेत? कुठे भूमिगत झाले? मोदी का बोलत नाहीत? शासनातील विविध पदांवर राहून मोदींना 25 वर्ष झाली आहेत. त्यामुळे शेकडो कोटीच्या जाहिराती दुष्काळी महाराष्ट्राला दिल्या आहेत. ही यांची सेवा? ही यांची संस्कृती? हे जाहिरातीवरचे 4-500 कोटी वाचवले असते, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. ही चमचेगिरी सुरू आहे. एकतर्फी चमचेगिरी सुरू आहे. त्याचा अंत होत आहे. राहुल गांधींनी ती वेळ आणली आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?