मुंबईकरांनो सावधान, पुढील 3 तास जोरदार पावसाचे, IMD चा अंदाज

सचिन पाटील

Updated on: Sep 26, 2019 | 6:34 PM

मुंबईतही सतर्कतेचा (Mumbai rain alert) इशारा देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 तासात मुंबईत अतिवृष्टी होईल (Mumbai rain alert) असा इशारा आयएमडीने दिला आहे.

मुंबईकरांनो सावधान, पुढील 3 तास जोरदार पावसाचे, IMD चा अंदाज

मुंबई : पुणे आणि परिसरात झालेल्या तुफान पावसाने थैमान घातलं असताना, मुंबईतही सतर्कतेचा (Mumbai rain alert) इशारा देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 तासात मुंबईत अतिवृष्टी होईल (Mumbai rain alert) असा इशारा आयएमडीने दिला आहे. मुंबई महापालिकेनेही सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील दोन-तीन तासात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पण नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नका, तसंच अफवांवर विश्वासही ठेवू नका. काळजी घ्या, मदतीसाठी 1916 या नंबरवर संपर्क साधा असं ट्विट मुंबई महापालिकेने केलं आहे.

हवामान विभागाच्या या इशाऱ्याने घरी पोहोचणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ होण्याची शक्यता आहे.  बहुसंख्य कार्यालयाचं कामकाज आटोपून कर्मचारी वर्ग घरी परतत आहे. जर पावसाला सुरुवात झाली तर त्यांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

पुण्यात पावसाचं थैमान

पुण्यात काल (बुधवारी) रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ (Pune City Heavy Rains) घातला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील बरेचसे रस्ते जलमय झाले असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसातील बळींचा आकडा 13 वर पोहोचला आहे. पुण्यात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, 575 लोकांना वाचवलं आहे. तर 3500 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या 

Pune Rain Live Update | पुण्यात पावसाचा कहर, मृतांचा आकडा 13 वर  

LIVE : मुंबईकरांनो घरी लवकर पोहोचा, पुढील तीन तासात शहरात अतिवृष्टीचा इशारा 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI