कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या एंजेल्स फॉरेस्ट हायवे ( Angeles Forest Highway ) येथे झालेल्या कारच्या भयानक अपघातातून एक दाम्पत्य सुदैवाने आश्चर्यकारकरित्या बचावले आहे. आयफोन – 14 ( iPhone-14 ) मध्ये असलेल्या एका फिचर्समुळे 300 फूट खोल दरीत कार कोसळूनही या दाम्पत्याचा उर्वरित जगाशी संपर्क झाला. त्यामुळे या दाम्पत्याने आयफोनच्या इमर्जन्सी सर्व्हिसचे तसेच रेस्क्यू टीमचे आभार मानले आहेत.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया एंजेल्स फॉरेस्ट हायवेवर प्रवास करताना कारचा ताबा सुटल्याने एका दाम्पत्याची कार तीनशे फूट दरीत कोसळली. या ठिकाणी कोणतेही फोन नेटवर्क काम करीत नव्हते. त्यावेळी आयफोन – 14 चे क्रॅश डिटेक्शन फिचर त्यांच्या कामी आले. आयफोनच्या या फंक्शनमुळे ३०० फूट दरीतून त्यांचा उर्वरित जगाशी संपर्क झाला, इमर्जन्सी एसओएस सॅटेलाईट फंक्शन म्हणचे नेमके काय? ते पाहूया..
ज्यावेळी सेल्यूलर फोनचे नेटकर्क कामी येत नाही, त्यावेळी आयफोन – 14 चे क्रॅश डिटेक्शन फिचरमधील सॅटेलाईट नेटवर्कचा वापर करता येतो. या सॅटेलाईट नेटवर्कचा वापर करून त्यांनी आपल्या ठावठिकाण्याचा एक टेक्स मॅसेज तयार करीत मदतीची याचना केली.
हा संदेश त्यांनी एप्पलच्या रिले सेंटरला पाठविला. त्यानंतर सूत्रे हलली. एप्पलच्या रिले सेंटरच्या कर्मचाऱ्याने तातडीने हा संदेश लॉस एजिल्स कंट्री शेरीफच्या कार्यालयाला पाठवित मदतीची मागणी केली. लागलीच सर्च अँड रेस्क्यू टीमला एक दाम्पत्य तीनेशे फूट दरीत कोसळल्याचे लोकेशन देण्यात आले.
हॅलिकॉप्टरसह ही टीम घटनास्थळी रवाना झाली. या टीम दुर्घटनाग्रस्त कारच्या जखमी दाम्पत्याला शोधून काढीत त्यांना रूग्णालयात भरती केले. या फिचरमुळे अलिकडेच एका महिलेचा कार अपघात झाला असता तिच्या पतीला मॅसेज गेल्याने डॉक्टराची मदत मिळण्यापूर्वी पतीला तेथे पोहचता आले.
आयफोन-14 हे फिचर वरदान ठरत असून सध्या केवळ इमर्जन्सी एसओएस व्हाया सॅटेलाईट हे फिचर अमेरीका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड आणि इंग्लंड या देशातील आयफोन ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
The first HELICOPTER rescue with Emergency SOS via Satellite on iPhone 14 has occurred in California ‼️🚁 pic.twitter.com/4hRSfRAbR2
— AppleTrack (@appltrack) December 16, 2022