AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धी विनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी? राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर सरकारचे मोठे पाऊल, काय आहे अपडेट?

Raj Thackeray-Siddhivinayak Temple Theft: मनविसेच्या मेळाव्यात शनिवारी राज ठाकरे यांनी राम मंदिरातील दान चोरीचा उल्लेख करत मोर्चा सिद्धिविनायक मंदिराकडे वळवला. दरवर्षी या मंदिरातून 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता सरकार खडबडून जागे झाले आहे. त्यांनी मोठे पाऊल टाकले आहे. याप्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे.

सिद्धी विनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी? राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर सरकारचे मोठे पाऊल, काय आहे अपडेट?
राज ठाकरे, सिद्धी विनायक मंदिर
| Updated on: Aug 04, 2026 | 12:51 PM
Share

देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध धार्मिकस्थळांपैकी एक मुंबई येथील श्री सिद्धी विनायक मंदिरातील अपहारावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मनविसेच्या मेळाव्यात यावरून सरकारवर निशाणा साधला. मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर सरकार खडबडून जागे झाले. महाराष्ट्र विधी आणि न्याय विभागाने मंदिर ट्रस्टकडून एक सविस्तर आर्थिक अहवाल मागवला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. तर राज्य सरकार या अहवालाआधारे पुढील मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री शिंदेंकडे अगोदरच तक्रार

1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा (MNVS) 20 वा स्थापना दिवस कार्यक्रम मुंबईत झाला. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात तुफान भाषण केले. सिद्धी विनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटी रुपयांची दान चोरी करण्यात आली. याविषयीची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटले.

शिंदे यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार नाही

राज ठाकरे यांच्या आरोपानंतर सिद्ध विनायक मंदिर ट्रस्टने एकनाथ शिंदे यांना असे कोणतेही पत्र लिहिले नसल्याचा दावा केला. विधी आणि न्याय विभागाने प्रशासनाला आर्थिक अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे ट्रस्टी राहुल लोंढे यांनी स्पष्ट केले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार पुढील कायदेशीर अथवा प्रशासकीय कारवाई निश्चित करेल. या ट्रस्टचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री सदा सरवणकर यांनी या अपहाराचा सुगावा सर्वात अगोदर ट्रस्टींनाच लागल्याचा दावा केला. मे 2026 मध्येच ट्रस्टींनी विधी आणि न्याय विभागाकडे विशेष लेखापरीक्षण करण्याची विनंती केल्याचे ते म्हणाले. तर आपण लाचलुचपत प्रतिबंध विभागासह प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार केल्याचा दावाही सरवणकर यांनी केला. त्यानंतर मंदिरात तपास अधिकारी दाखल झाल्याचे ते म्हणाले.

CCTV मुळे उघड झाली चोरी

मंदिरातील दान चोरी जात असल्याचे कथित प्रकरण सर्वात अगोदर 20 मार्च रोजी समोर आले होते. तेव्हा एका छोट्या दानपेटीतील नगद चोरीला गेल्याचे समोर आले होते. सुरुवातीला दादर पोलीस ठाण्यात 10,000 चोरी केल्याची तक्रार करण्यात आली होती. तपासाची चक्र फिरल्यानंतर आरोपींकडून 80,000 रुपये जप्त करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात काही लोक सलग 10 दिवस छोट्या दानपेटीतून वारंवार पैसे काढताना दिसून आले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी