AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी प्रार्थना… आता आंदोलन… कबूतरखान्यासाठी जैन समाज आक्रमक, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांसोबत बाचाबाची

जैन समाज मोठ्या संख्येने कबूतर खाना परिसरात पोहोचला आहे. लोक कबूतर खान्यातील ताटपत्री काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांसोबत आंदोलकांची बाचाबाची झाली आहे. जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे यावेळी बघायला मिळत आहे.

आधी प्रार्थना... आता आंदोलन... कबूतरखान्यासाठी जैन समाज आक्रमक, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांसोबत बाचाबाची
mumbai
| Updated on: Aug 06, 2025 | 10:50 AM
Share

कबूतरखाना परिसरात जैन समाज आज आंदोलन करणारे होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आता जैन समाज मोठ्या संख्येने कबूतरखाना परिसरात पोहोचला आहे. लोक कबूतर खान्यातील ताटपत्री काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काही महिला या कबूतर खान्यात उतरल्या असून महापालिकेने लावलेली ताडपत्री त्यांनी काढून टाकली आहे. पोलिस आणि आंदोलकांनी बाचाबाची झालीये. पोलिस आंदोलकांना थांबण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक हे आक्रमक झाली आहेत. जैन समाज आणि आंदोलकांमध्ये सध्या झटापट सुरू आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेकडून हा कबूतर खाना बंद करण्यात आला. मात्र, कबूतरखाना बंद केल्यानंतरही मनाई असताना लोक कबूतरांना धान्य टाकत असल्याचे लक्षात आले. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त करत कबूतरांना धान्य टाकणाऱ्यांवर सक्त कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर महापालिकेकडून दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली. जेणे करून लोक तिथे धान्य टाकू शकणार नाहीत आणि कबूतर तिथे बसणार नाहीत.

ताडपत्री टाकल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला. आधी त्यांनी म्हटले की, आम्ही कबूतरखान्याजवळ प्रार्थना सभा घेणार आहोत. त्यानंतर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, नंतर सांगण्यात आले की, आंदोलन रद्द करण्यात आलंय. मात्र, आज सकाळी प्रत्यक्षात जैन समाजाचे लोक मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी एकच हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडली.

यावेळी पोलिसांसोबत त्यांनी बाचाबाची झाली. मात्र, जैन समाज चांगलाच आक्रमक झाला. महिला या कबूतरखान्यामध्ये उतरल्या आहेत. पालिकेकडून बांधण्यात आलेली ताडपत्री काढण्यात आलीये. यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त देखील तिथे पोहोचला आहे. मात्र, या घटनेनंतर जैन समाजाच्या भावना या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचे काम सध्या सुरू असल्याचे बघायला मिळतंय. अगोदरपासूनच या भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या दादरमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे बघायला मिळतंय.

कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महापालिकेने नियंत्रित पद्धतीने खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिलेयत. त्यामुळे सरकारने जैन समाजाच्या दबावापुढे नमते घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. भाजप राजकीय फायद्यासाठीच जैन समाजाला खूश करीत असल्याची टीका शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केलीये.

जैन समाजातील काही जणांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाची मागणी मान्य करीत सपशेल माघार घेतल्याची टीका शिवसेना (ठाकरे) व मनसेने केली आहे. कबुतरखान्यांबाबत जैन धर्मीयांच्या मताचाही आदर आहे. मात्र कबुतरांमुळे क्षयरोगासारखा आजार पसरत असेल तर कबुतरखान्यांच्या परिसरात अशा प्रकारचे किती रुग्ण आढळले याचेही सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचे ठाकरे गटाचे स्थानिक आमदार मदेश सावंत यांनी म्हटले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.