AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत रुग्णसंख्या 40 हजारावर पोहोचण्याचा अंदाज, सरकारकडून जम्बो तयारी : जयंत पाटील

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे (Jayant Patil on Corona). मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारावर पोहोचण्याची शक्यता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वर्तवली आहे.

मुंबईत रुग्णसंख्या 40 हजारावर पोहोचण्याचा अंदाज, सरकारकडून जम्बो तयारी : जयंत पाटील
| Updated on: May 20, 2020 | 7:35 PM
Share

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे (Jayant Patil on Corona). मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारावर पोहोचण्याची शक्यता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोनाचा सामना कण्यासाठी जम्बो तयारी करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली (Jayant Patil on Corona).

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात जम्बो फॅसिलिटी सुरु करण्यात आली आहे. एमएमआरडीमध्ये हजार बेड्सच्या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या हजार बेड्ससाठी 50 डॉक्टर हे आंबेजोगाईच्या कॉलेज येथून आले आहेत. त्यांची व्यवस्था दादरच्या ट्रायडेंट येथे करण्यात आली आहे. त्याजवळच एशियन आर्ट इन्स्टिट्यूट येथे आयसीओची व्यवस्था करण्यात आली आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“हजार रुग्णांपैकी कुणाची प्रकृती बिघडल्यास त्याला दोन मिनिटात आयसीयूत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात आणखी हजार बेड्सची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात येईल”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

“गोरेगाव येथे जूनच्या अखेरीस आणखी एक हजार बेड्सची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय नॅशनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळील जी डोम आहे तिथे सीएसआरच्या माध्यमातून 500 बेड्स आणि 50 आयसू बेड्स उभारण्यात आले आहेत. ही व्यवस्था 31 मे पासून महापालिका या डोमचा वापर करेल. रेस कोर्सच्या पार्किंग लॉटमध्ये 800 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स महापालिकेच्या ताब्यात

“मुंबई महापालिकेतील काही खासगी रुग्णालयांकडून जास्त बील आकारलं जात होतं. या रुग्णालयांमध्ये फक्त श्रीमंत वर्गच जातो, असं समजलं जातं. या रुग्णालयांमध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेणं परवडणारंच नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

“मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या निर्देशानुसार महापालिकेने पुढच्या 90 दिवसांसाठी या सर्व खासगी रुग्णालयांचे 2300 आयसीयू बेड्स, 2350 कोविडसाठी बेड्स आणि 2500 नॉन कोविडसाठी बेड्स असे जवळपास 80 टक्के बेड्स ताब्यात घेतले आहेत. या सर्व बेड्सची व्यवस्था ते खासगी रुग्णालयं करणार आहेत. रुग्णाला तिकडे पाठवण्याची व्यवस्था महापालिकेकडून केली जात आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“विशेष म्हणजे या खासगी रुग्णालयातील सर्व 80 टक्के बेड्सचं बील हे केईएम रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालय या सरकारी रुग्णालयाप्रमाणे आकारलं जाणार आहे. उरलेले 20 टक्के बेड्स हे खासगी रुग्णालयांना दिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीला पैसे भरुन उपचार घ्यायचा असेल तर ती व्यक्ती त्यापद्धतीने उपचार घेऊ शकते. श्रीमंत वर्गांसाठी ती मुभा देण्यात आली आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

“गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या अख्यत्यारितील शासकीय रुग्णालयात ही व्यवस्था आहे. आता तशी व्यवस्था मुंबई महापालिकेचे आयुक्तांनी खासगी रुग्णालयांमध्येही केली आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णालयांमध्ये उपचाराची किंमत एक लाख रुपयांपर्यंत मोजावी लागते, अशा रुग्णालयात हजार ते पंधराशे रुपयात उपचार होणार आहे”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

रुग्णांसाठी कंट्रोलरुम

“मुंबईत कुठल्या रुग्णाने कुठे जावं? यासाठी डॅशबोर्ड महापालिकेने तयार केलं आहे. यासाठी काही प्रात्याक्षिके देखील घेण्यात आली आहेत. आजपासून हा डॅशबोर्ड योग्य वेळेवर सुरु होणार आहे. यामध्ये बेड्स कुठले आहेत, त्यातील ऑक्सिजनेटेड बेड्स कुठले आहेत, आयसीयूचे आणि जनरल बेड्स किती आहे? याबाबत 19001916 या फोन नंबरवर माहिती मिळेल. हा नंबर कंट्रोल रुमचा आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“कंट्रोल रुममध्ये 10 डॉक्टर बसलेले असतील. हे डॉक्टर पेशंटचा अंदाज घेऊन त्या पेशंटला कोविड की नॉन कोविड रुग्णालयात घेऊन जायचं? त्या रुग्णालयांमध्ये आयसीयूची व्यवस्था आहे की नाही? याबाबत ताबडतोब सांगतील. त्यामुळे कुठल्याही मुंबईतील रुग्णाला रुग्णवाहिकेची 10 ते 15 मिनिटात व्यवस्था होईल. त्या रुग्णाला योग्य रुग्णालयात दाखल करण्यात येईल”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

मुंबईत 330 रुग्णवाहिका कार्यरत

“मुंबई शहरात आतापर्यंत 45 रुग्णवाहिका उपलब्ध होत्या. मात्र, आता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन 330 रुग्णवाहिका मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यरत केलेले आहेत. यामध्ये पूर्वीच्या 80 आणि अजून 250 नव्या रुग्णवाहिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्व व्यस्था करण्यात आली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

“काही ठिकाणी बीएसटीच्या 50 बस वापरण्यात आल्या आहेत. तर जवळपास 200 इन्नोव्हा आणि टाटा सुमो याचं रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईत आता रुग्णवाहिकेची कमतरात भासणार नाही. जवळपास 330 रुग्णवाहिका फिरतील. त्यामुळे एखादा कॉल आला तर 15 ते 20 मिनिटात रुग्णवाहिका दाखल होईल”, असं जयंत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

पोलिसांनी जप्त केलेले मास्क, पीपीई किट्स कोरोना योद्ध्यांपर्यंत पोहोचवा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

स्वत:चं घर क्वारंटाईनसाठी देणारा देशातील पहिला खासदार, धैर्यशील मानेंचा आणखी एक दिलदारपणा

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.