पोलिसांनी जप्त केलेले मास्क, पीपीई किट्स कोरोना योद्ध्यांपर्यंत पोहोचवा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोहन जोशी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायलयाने हे आदेश दिले.  (Mumbai HC Order to use seized Mask, PPE kit)

  • अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 19:17 PM, 20 May 2020

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी साठेबाजांकडून हजारो मास्क, हँड सॅनिटायझर्स, पीपीई किट्स या वैद्यकीय वस्तू जप्त केल्या होत्या. या सर्व वस्तू कोरोनाविरोधात लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायलयाने दिले आहेत. माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोहन जोशी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायलयाने हे आदेश दिले.  (Mumbai HC Order to use seized Mask, PPE kit)

कोरोना या संसर्गजन्य आजाराविरोधात डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर वैद्यकीय अधिकारी लढत आहेत. त्यांना स्वसंरक्षणासाठी मास्क, हँड सॅनिटायझर्स, पीपीई कीट्स या वैद्यकीय वस्तू देणे आवश्यक आहे. गेल्या दोन महिन्यात पोलीस खात्याने काळाबाजार रोखण्यासाठी धाडी टाकून मास्क, हँड सॅनिटायझर्स, पीपीई कीट्स या वैद्यकीय वस्तू जप्त केल्या आहेत.

मात्र आता त्या वस्तूंची अत्यंतिक गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन आता (Mumbai HC Order to use seized Mask, PPE kit) न्यायालयीन प्रक्रियेत अडकून न राहता न्यायालयानेच त्या वस्तू वापरासाठी खुल्या करण्याचे निर्देश द्यावेत अशी जनहित याचिका मोहन जोशी यांनी दाखल केली होती. यावर मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश एस.एस.शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली.

या जप्त केलेल्या वैद्यकीय वस्तू वापरासाठी मिळाव्यात याकरिता बृहन्मुंबई महापालिकेने पोलिसांकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार वितरण सुरु केले. त्यामुळे हे प्रकरण प्रलंबित ठेवता येणार नाही. ज्यांना या वस्तू हव्या आहेत, त्यांना या वस्तू द्याव्यात आणि राज्य सरकारने वितरणाकडे लक्ष ठेवावे असे आदेशात नमूद केले आहे.

ज्या उद्देशाने ही याचिका दाखल केली होती त्याला न्याय मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, साफसफाई कर्मचारी, पोलीस यांना या वस्तूंची आवश्यकता आहे. मुंबईत त्याचे वितरण सुरु झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व राज्यांमध्ये या वस्तूंचे वाटप होणार आहे याचे मला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी दिली. (Mumbai HC Order to use seized Mask, PPE kit)

संबंधित बातम्या : 

राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक 76 कोरोनाबळी, बाधितांचा आकडा 37 हजार पार

पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील कर्मचारी, पोलीस ठाण्यात दीड हजार जणांची ड्युटी