AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती : आव्हाड

मुंबई : काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी […]

...तर पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती : आव्हाड
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई : काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

” काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती”, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आयईडी स्फोट घडवला आणि यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीच्या पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानात घुसून, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर 1000 किलोंचा बॉम्ब टाकला आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. ही लढाऊ विमानं काँग्रेस सरकारच्या काळात खरेदी करण्यात आली होती. त्या गोष्टीचा आधार घेत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, चावताळलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत 10 किलोमीटरपर्यंत 20 विमानं घुसवली होती. मात्र, भारताने पाकिस्तानला पुन्हा प्रत्युत्तर देत, सर्व विमानं माघारी धाडली.

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!