ऐनवेळी ज्योतिरादित्य शिंदेंची ऑनलाईन हजेरी, नारायण राणे एकटे पडले?; शिवसेना कार्यक्रम हायजॅक करणार?

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. (jyotiraditya scindia will attend chipi airport inauguration programme on online)

ऐनवेळी ज्योतिरादित्य शिंदेंची ऑनलाईन हजेरी, नारायण राणे एकटे पडले?; शिवसेना कार्यक्रम हायजॅक करणार?
narayan rane

मुंबई: सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. या सोहळ्यासाठी ठाकरे आणि शिंदे एकाच विमानातून जाणार असल्याची चर्चाही होती. मात्र, आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावणार नसून ते ऑनलाईन हजेरी लावणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकटे पडल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच शिंदे येत नसल्याने या कार्यक्रमावर शिवसेनेचीच छाप पडणार असल्याचंही बोललं जात आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात होतं. ठाकरे आणि शिंदे एकाच विमानातून आणि राणे दुसऱ्या विमानातून चिपीकडे जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. कालपर्यंत ठाकरे-शिंदे चिपीला एकत्र जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मुख्यमंत्री कार्यालयही नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संपर्कात होते. पण शिंदे यांनी अचानक कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार असल्याचं सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कालच्या पीसीमुळे शिंदेंनी निर्णय बदलला

चिपी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच काल नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन चिपीचं सर्व श्रेय आमचं असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेचा चिपी विमानतळाशी काहीच संबंध नसल्याचं सांगितलं होतं. तसेच निमंत्रण पत्रिकेत बारीक अक्षरात नाव टाकल्याने नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचंही म्हटलं होतं. राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्ये आपण सीनियर असल्याचं राणे म्हणाले होते. राणेंच्या या विधानामुळेच शिंदे यांनी आपला निर्णय बदलला असावा असं सांगितलं जात आहे. कार्यक्रमात राणेंकडून मानापमान नाट्य रंगू शकते, असा अंदाज आल्यानेच शिंदे यांनी कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावण्याचा निर्णय घेतला असावा असं सूत्रांचं म्हणणं आहे.

खुर्चीतील अंतरही वाढवलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे तब्बल 12 वर्षानंतर एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचं त्याकडे लक्ष लागलं आहे. चिपीच्या उद्घटानाच्या कार्यक्रमात राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत दीड फुटाचं अंतर होतं. नंतर हे अंतर अडीच फूट करण्यात आलं आहे. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राणे एकाकी?

शिंदे यांनी ऐनवेळी ऑनलाईन कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर विरोधी पक्षनेत्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. स्टेजवर राणे आणि त्यांचे चिरंजीव नितेश राणे असतील. पण फक्त भाषण करण्याची संधी केवळ राणेंनाच असणार आहे. तर, शिवसेनेकडून मुख्यमंत्री ठाकरे, पालकमंत्री अनिल परब आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई हे कार्यक्रमात भाषण करणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमावर शिवसेनेचीच छाप पडणार असून या कार्यक्रमात राणे एकटे पडल्याचं चित्रं दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

ठाकरे-राणे एकाच मंचावर

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

 

संबंधित बातम्या:

Sindhururg Chipi Airport Inauguration : कोकणात राजकीय शिमग्याला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंच्या आसन व्यवस्थेतील अंतर वाढवलं

उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही, राणेंची घोषणा, सौजन्यशील की बॅकफुटवर?

Sindhudurg Chipi Airport : विमानतळ सिंधुदुर्गाचं पण मग नाव ‘चिपी परुळे’ का? वाचा रंजक माहिती

(jyotiraditya scindia will attend chipi airport inauguration programme on online)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI