Sindhururg Chipi Airport Inauguration : आजचा दिवस आदळाआपट करण्याचा नाही, मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

कोकणवासियांसाठी आज खरोखर मोठा दिवस आहे. कारण सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. दुपारी 1 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.

Sindhururg Chipi Airport Inauguration : आजचा दिवस आदळाआपट करण्याचा नाही, मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला
Narayan Rane_Uddhav Thackeray

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आहेत. तब्बल 16 वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र पाहयाला मिळाली. मात्र यावेळी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर पुन्हा एकदा पाहायला मिळालं. इतकंच नाही तर व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 09 Oct 2021 14:21 PM (IST)

  आजचा दिवस आदळाआपट करण्याचा नाही, मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :

  मुख्यमंत्र्यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं.

  आजच्या हा क्षण आदळाआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचं आहे. ज्योतिरादित्य यांचं अभिनंदन करतो. कारण इतक्या लांब राहूनही तुम्ही मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक संस्कार असतो. मातीच्या विना काही वेळेला मातीला जाणे. त्यात काही बाभळीचे आणि आंब्याची असतात. बाभळीचे झाडे उगवले तर माती म्हणणार मी काय करु? जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे. शिवसेना आणि कोकण हे नातं मी सांगायला नको. मी स्वत: अनेकदा म्हणटलो आहे. कोकणवासीयांसमोर शिवसेना प्रमुख नतमस्तक झालं.

  कुणी काय करावं हा ज्याचात्याचा विषय आहे. मी त्याविषयावर नंतर बोलेलही कदाटचित. पण आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचं वैभव आहे ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. आपण गोव्याचा विरोधात नाही. पण आपलं वैभव कमी नाही. उलट आपण काकणभर सरस आहोत. कमी अजिबात नाहीत. एवढे वर्ष विमानतळाला का लागले? आम्ही कोकणचं कॅलिफोर्निओ करु असे काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्निओला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करु. बाकीचे गोष्ट आदित्यने सांगितले आहेत. पांठतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेल.

  ज्योतिरादित्यजी परवा आपली खूप चांगली बैठक झाली. मी प्रामाणिकपणे सांगतो, गेल्या दोन वर्षात एक कोरोना बोकांडी बसला आहेच. पण काहीवेळा केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागतं. अनेकदा असं जाणवतं की, हे बोलणं कोरडं असतं. पण ज्योतिरादित्य ही अशी व्यक्ती आहे की त्यांनी स्वत:हून बैठकीची वेळ मागितली. मी काही बोलण्याआधी ज्योतिरादित्य अधिक तळमळीने बोलत होते. मला असं वाटलं मी केंद्रीय मंत्री आहेत आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोघांची नाळ या मातीशी जोडली आहे. इथे राजकारण येणार नाही.

  ज्योतिरादित्य आपण एकत्र येऊन विकास करुयात. जे काही आधीचे विकासाच्या बाबतीत बोलून गेले आहेत त्याबाबत मी परत बोलणार नाही. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला. निळेशार पाणी, सुंदर लाल माती आहे. हे सगळं वैभव मी हवाई फोटोग्राफीच्या निमित्ताने हेलिकॉफ्टरमधून बघितलं. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा प्रयत्न आहेत. त्यासाठी मी ज्योतिरादित्य यांची मदत लागेल. इथे एक हेलिपोर्टही असलं पाहिजे. हेलिकॉप्टरने सुंदर किनाऱ्याचं वैभव हवेतून दिसेल तर पर्यटनाला चांगलं चालन मिळेल.

  कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. हेही खरंय की या व्यासपीठावर महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. त्यामुळे सगळ्यांचं विकासासाठी अलायन्स आहे. एखादी चांगली गोष्टी असेल तर नजर लागू नये एक काळे किट्टा लावा लागतो. ते लावणारे काही लोकं आहेत. नारायण राणे आपण म्हणालात ते खरं आहे. आपण गोष्टी तुम्ही केल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत, संयमी आहे म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन काहितरी करेल असं नाही. ती मर्द आहे. म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने हक्काचा लोकप्रतिनिधी आहे. म्हणून विनायक राऊत इथे निवडून आलेले खासदार म्हणून उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. हेही खरं आहे. बाळासाहेबांना खोटं बोलणं अजिबात आवडायचं नाही. त्यांना एक क्षणही आवडायचं नाही. अशी खोटं बोलणारी जी लोकं होती त्यांना बाळासाहेबांनी शिवेसेनेतून काढून टाकलं होतं हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोलं. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. मला त्या इतिहासात जायचं नाही. आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा फोन केला तेव्हा दुसऱ्याच क्षणी मी सही केली. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही. पण पेड्यातला गोडेपणा अंगी बाळगावा लागतात. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात. मला बोलायचं नाही. मला बोलावं लागला. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करु

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे आले आहेत. सगळे मिळून काम करु. आजपर्यंत जे खड्डे मग ते कारभाराचे किंवा रस्त्यावरचे पडले किंवा पाडले गेले असतील ते बुजवण्याचं काम एकत्र मिळून करणार नसू तर आपल्याला निवडून दिलेल्या जनेतचं दुर्भाग्य असेल. खड्ड्यात गेलेली लोकशाही, असं बोलण्याची वेळ निदान त्यांच्यावर येऊ द्यायची नसेल तर विकासाच्या कामात राजकीय जोडे आणू नाही. हे माझं महाराष्ट्राचं राज्य आहे, जसं ज्योतिरादित्य शिंदे बोलले ती परंपरा आपण घेऊन पुढे जातो आहोत. ती घेऊन जात असताना तलवार चालवायची वेळ आलीच तर ती तलवार आपल्या देशाच्या-राज्याच्या शत्रूवर चालली पाहिजे. आपपासात जर चालली तर तसं दुर्भाग्य या मातीचं दुसरं कोणतं नसेल. मी आपल्याला परवा विधानभवनात बोललो होतो. संधी मिळणं हे मोठं काम असतं. संधी मिळायला कष्ट तर लागतं याशिवाय नशिबही लागतं. या संधीची माती न करता सोनं करण्याचा प्रयत्न केला तरच या सगळ्याचा उपयोग होईल.

 • 09 Oct 2021 14:12 PM (IST)

  आज माझ्यासाठी खूप भावनिक क्षण : ज्योतिरादित्य शिंदे

  केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे :

  शिंदे यांनी सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे स्वागत केलं.

  माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझं एक पारंपरिक आणि रक्ताचं संबंध आहे. माझं सिंधुदुर्गासोबतही संबंध आहे. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचा प्रतिक आहे. मी 500 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. पण छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते. शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आमच्या मराठ्यांचा गौरव क्षण आहे. आमची सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. हे तीन दशकांचं संकट होतं. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं माझ्या वडिलांचं विमानतळाचं एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकणात रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद आणि अभिनंदन करतो.

  तीन वर्षांपूर्वी एक प्लेन आलं होतं. आज त्याच ठिकाणी एक नवं विमानतळाचं उद्घाटनाचा श्रीगणेशा आम्ही एकत्र मिळून करत आहोत. कोकणाला प्राकृतिक सौंदर्य आहे. आंबे, काजू, मासे हे सगळे व्यवसाय आम्हाला देशात प्रसिद्ध करायचं आहे. सिंधुदुर्गात किल्ला, समुद्रतट, मंदिरं सगळं आहे. गोव्याची प्रसिद्धता आम्हाला सिंधुदुर्गात हवं आहे. गोव्या जवळ आहे. इथे पर्यटनाचं केंद्र आम्हाला पाहिजे. आज सुरुवात झाली. ही फक्त सुरुवात आहे. 500 किमीचं अंतर 50 मिनिटात पार करणार. पुढक्या काही दिवसात 20-25 फ्लाईट सिंधुदुर्गात पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी लोकल फॉल ग्लोबलची घोषणा केली आहे. आम्ही सिंधुदुर्गाचा नक्कीच तसा विकास करु. पंतप्रधानांच्या नेतृत्वात काम करु. आम्ही सर्व एकत्र येऊन काम केलं तर असंभव कार्यक्रमही संभव होणार आहे.

 • 09 Oct 2021 14:11 PM (IST)

  ज्योतिरादित्य शिंदे काय म्हणाले?

  ज्योतिरादित्य शिंदे काय म्हणाले?
  नवजवान मंत्री, ठाकरे परिवारातील तिसरी पिढी आदित्य ठाकरे असा उल्लेख
  सिंधुदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक वारसा, पोर्तुगिजांची आक्रमणकारी विचारधारा होती. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराजची संकल्पना होती. त्ायनंतर पेशवे होते, शिंदे, होळकर, गायकवाड होते. कोकणला आझादी दिली. मराठी माणसाचा हा गौरवशाली इतिहास आहे. माझ्यासाठी हा भावूक क्षण आहे. ठाकरे आणि नारायण राणेंना निवेदन करतो, सिंधुदुर्ग धरती केसरी आहे, या धरतीवर नवी मुहूर्तमेढ रोवत आहोत. हे केवळ विमानतळाचं उद्घाटन नाही, इथे नवा इतिहास, नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.

 • 09 Oct 2021 14:05 PM (IST)

  विनायक राऊत पेढे द्यायला आले, मी त्यांना म्हटलो, पेढ्याचा गुणधर्म घ्या : नारायण राणे

  विनायक राऊत पेढे द्यायला आले. मी अर्धा पेढा घेतला. मी त्यांना म्हणालो पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. तो गुणधर्म आत्मसात करा. बोलायचं तेव्हा हसत बोला. विचारातून माणसांची मतं जिंकता येतात हे मी सांगायला नको. असो, सर्व मंत्री आलेत. सिंधुदुर्गात वाहतूक-विमान सुरु करायला. त्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. विमानतळाच्या आजूबाजूला सौंदर्य मिळावं यासाठी खर्च करा, अशी विनंती अर्थमंत्री अजित पवारांना करतो. इतथल्या लोकांना चांगला रोजगार मिळेल. त्यांना उभं करण्याचं काम आम्ही सगळेच करु.

 • 09 Oct 2021 13:50 PM (IST)

  नारायण राणे यांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख

  नारायण राणे काय म्हणाले?

  नारायण राणे यांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख

  अति महत्त्वाच्या सिंधुदुर्गासाठी उपयुक्त विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे

  माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण, या कार्यक्रमासाठी राजकारण करु नये असं वाटत होतं, जाऊन शुभेच्छा द्याव्या, सिंधुर्गातील चिपी विमानतळावरुन उडणारं विमान पाहण्यासाठी मी आलो होतो, आलो, मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेबही भेटलो, काहीतरी माझ्या कानाजवळ बोलले, मी एक शब्द ऐकला, असो

  बांधवानों विमानतळ होणं आवश्यक आहे, देश-विदेशातील पर्यटक इकडे यावेत, ४-५ लाख पर्यटकांनी खर्च करावेत, सिंधुदुर्गातील व्यावसायिकांकडे ते पैसे यावेत आणि आर्थिक समृद्धी कोकणला यावी हा या विमानतळाचा उद्देश आहे.

  १९९० ला मी सिंधुदुर्गात आलो, माझा जन्म इकडचाच. बाळासाहेब ठाकरे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जा आणि मी आलो आणि निवडणूक लढवली, १९९० साली जिंकलो. मी जिल्हा संपूर्ण फिरलो, अडचणी समजून घेतल्या. फेब्रुवारीनंतर पिण्यासाठी पाणी नव्हतं. ५ हजार मिमी पाऊस पडतो, तरीही पाणी पिण्यासाठी नसतं. राज्यात रस्ते नव्हते, शाळा नव्हत्या, त्या उभ्या कराव्या लागल्या.

  कोकणचा हा जिल्हा मुंबईवर अवलंबून होता. मी १९९० मध्ये आलो, त्यावेळी अडीअडचणीला कोण आलं हे लोकांना माहिती आहे. उद्धवजी हे सर्व साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं, करत आहे,. त्यात माझा स्वार्थ काही नव्हता. मी छोटा उद्योजक, यावर अवलंबून राहायचं कारण नाही.

  मला कुणीतरी मार्गदर्शन केलं, टाटा इन्स्टिट्यूटकडे जा आणि जिल्हा कसा विकसित करावा हे सांगितलं, त्यांनी रिपोर्ट दिला पर्यटनाच्या माध्यमातून या या गोष्टी करा, बाजूला गोवा आहे, टुरिझम आहे, जिल्ह्याला हिलस्टेशन आंबोली आहे पर्यटनासाठी चांगलं वातावरण आहे..

  ९५ मध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आली, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. सरांनी सांगितलं, हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून देशपातळीवर जाहीर करण्यासाठी केंद्राची परवानगी घेऊ, ती घेतली आणि हा पर्यटन जिल्हा झाला. त्यानंतर पायाभूत सुविधा उभारल्या.

  साहेबांचे आशिर्वाद होते, त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्यांना रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी १२० कोटी दिले, त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी ११८ कोटी रुपये दिले. जिल्ह्याला ८०-९० लाख यायचे मी ते १०० कोटी दिले. सुविधांसाठी कारणीभूत नारायण राणे आहे, दुसरा कोणी जवळ येऊच शकत नाही.

  इथल्या शाळा वर्ग, इथे मी एकाचवेळी ३४० शिक्षक आणले, राज्यात पहिल्या टॉपमध्ये सिंधुदुर्गातील विद्यार्थी होते. त्याला कारणीभूत कोण हे जनतेला माहितीय त्याचे श्रेय़ मी घेत नाही, त्यावेळी शिवसेनेत होतो, साहेबांचं श्रेय होतं मी निमित्त होतो. जसं सचिन बॅटिगं करताना स्कोर केलं ते बॅटने

  उद्धवजी एक विनंती आहे, माझ्याकडे एक फोटो आहे, मी आणि प्रभू याच ठिकाणी १५ ऑगस्ट २००९ ला उद्घाटनाला आलो, त्यावेळी समोरच्या बाजूला आंदोलन झालं, विमानतळ नको म्हटलं होतं. विमानतळ नव्हे रेडी बंदरही नको होतं, आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं.

  मी नावं घेतलं तर राजकारण होईल, आज हायवे, झालेत. राज्यात कुठे झालं नसेल ते रस्ते अडवण्यात आलं. आमचं भागवा आणि रस्ते चालू करा असं म्हटलं गेलं. अजित पवारांनी आज नाव घेतलं. जमिनी हस्तांतरणासाठी १०० कोटी दिले. त्यावेळी आंदोलन करणारे आज स्टेजवर आहेत. तेव्हा जे होतं ते आज नाही. परिस्थिती बदलतेय.
  तुम्ही आलात मला आनंद वाटला. सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत, त्यांनी अभ्यास करावा, ४८१ पानांचा टाटांचा रिपोर्ट वाचावा, निसर्ग कसा ठेवावा, भात आणि घरावरील कौलं कशी ठेवावी हे वाचा. धरणाची कामं पुढे जात नाहीत, माझ्यावेळी जेवढी झाली त्याच्या पुढे कामंच नाहीत.
  रस्ता नाही, पाणी नाही, कसला विकास? खड्डे पाहावे का लोकांनी? विमानतळाचं उद्घाटन करण्यापूर्वी रस्ते आणि अन्य कामं करावी.

  मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण, वीरेंद्र म्हस्कर गेले आणि दुसरे आले. स्टेजवर आलो आणि विनायक राऊतांनी सांगितल, म्हटलं कार्यक्रम कुणाचा, mIDC चा आहे, म्हस्कर साहेबांचा आहे, काय चाललंय, काय प्रोटोकॉल आहे की नाही?

  मान सन्मान जनता देईल. बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडले नाहीत,. थारा नव्हता.

  माझ्या दृष्टीने आदित्य टॅक्स फ्री आहे, मी बोलणार नाही. मी शुभेच्छा देईन. उद्धवजींना अभिप्रेत काम करुन दाखवा, मला आनंद वाटेल. सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही सर्व आलात आनंद आहे.

 • 09 Oct 2021 13:46 PM (IST)

  इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे : रामदास आठवले

  सिंधुदुर्गाच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान
  कारण चिपीमध्ये आलेलं आहे मुंबईवरुन विमान

  इथे एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे
  मला आठवले महायुतीचे गाणे

  हे दोघे जण एकत्र आलेले आहेत. राणेंनीही सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांशी माझं वैर नाहीय. आपण शिवशक्ती भीमशक्तीच्या निमित्ताने एकत्र होतो. विमानतळासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. नारायण राणे, उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, सगळ्यांनी प्रयत्न केलेत, आणि मी ही प्रयत्न केले : रामदास आठवले

 • 09 Oct 2021 13:40 PM (IST)

  अजित पवार काय म्हणाले?

  कोकणवासियांचं, महाराष्ट्राचं स्वप्न होतं. जगातील लोक गोवा पाहायला येतात, पण गोवा इतकं चांगेल समुद्र किनारे आपल्या कोकणाला लाभले आहेत, त्याला चालना देण्यासाठी आपण काम केलं.
  मी मुख्यमंत्र्यांसोबत येत होतो, त्यावेळीही आमची चर्चा हीच होती. या विमानतळाचा इतिहास मोठा आहे, या विमानतळासाठी अनेकांचं योगदान आहे. कुठलीही गोष्ट एकट्या दुकट्याने होत नसते, सामुदायिक जबाबदारी असते, ती पार पाडायची असते. कोकणला मोठा इतिहास, पर्यटक इथे रमून जातात, कोकणचं सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतात.
  विमानतळ झाल्यामुळे चिपी विमानतळासाठी जागा भरपूर आहे. विकासाची संकल्पना चांगली राबवू.
  या विमानतळामुळे कोकणच्या विकासाची वाटचाल सुरु होणार
  महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करत आहे, आज बातमी आली वादळ येतंय, निसर्ग, तोक्ते वादळं आली. संकटं आहेत, ग्लोबल वार्मिंगला आपण जबाबदार आहोत.
  इथल्या विमानतळाबाबत नाईट लँडिंगबाबत चर्चा झाली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. उद्याच्या ११ तारखेला नितीन गडकरींच्या भेटीची वेळ मागितली. मुंबई-गोवा हायवेचं काम रखडलंय ते करण्यासाठी आम्ही केंद्राशी संपर्कात आहे.
  महाविकास आघाडीने रेवस ते रेड्डी काम सुरु कऱण्याचा निर्णय घेतलाय, त्या संबंधीही गडकरींशी बोलणार आहोत,. त्यांचं नेहमीच महाराष्ट्राला मदत होते.
  पुण्यात भेट झाली, गडकरी म्हणाले अजित, आपण मुख्यमंत्र्यांसोबत बसू, आमच्याही काही मागण्या आहेत, चांगल्या पद्थतीने सर्व प्रश्न सोडवू.
  खूप काही बोलण्यासारखं आहे, पण पर्यटनाला चालना देण्याचं काम आपण करु.
  इथे मेडिकल कॉलेज मंजूर केलं आहे, सिंधुदुर्गात राज्य सरकार करणार आहे.

 • 09 Oct 2021 13:31 PM (IST)

  चिपी विमानतळासाठी सर्वांचं योगदान आहे : बाळासाहेब थोरात

  बाळासाहेब थोरात –

  चिपी विमानतळासाठी सर्वांचं योगदान आहे. ज्यांचं योगदान आहे, त्यांचं कौतुक करण्याचा हा क्षण आहे,
  आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री झाले, तरुण माणूस आहे, नवं काहीतरी करण्यासाठी ते अग्रेसर आहेत. पर्यटनासाठी मोठा वाव, त्यातून रोजगाराची संधी आहे, कोकणची समृद्धी होईल. नवी मुंबईचं विमानतळही लवकरच होईल, नवं जग उभा करताना दिसतंय, कोकण रेल्वेने जोडले, कोकणवासियांचं अभिनंदन, कोकणचा विकास कऱण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे

 • 09 Oct 2021 13:28 PM (IST)

  Chipi airport : कोकणच्या विकासासाठी अग्रेसर : आदित्य ठाकरे

  आदित्य ठाकरे यांनी भाषाणाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचंही नाव घेतलं. पर्यटन मंत्री म्हणून आश्वासन देतो, कोकणच्या विकासासाठी अग्रेसर असू, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

 • 09 Oct 2021 13:22 PM (IST)

  सुभाष देसाई काय म्हणाले?

  महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील नंबर एकचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख.
  नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख टाळला.
  या विमानतळाचं काम इतकी वर्ष रखडलं होतं, त्यासाठी पायगुण आवश्यक होता, तो पायगुण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने लाभला.
  या विमानतळासाठी सर्वांनी पाठपुरावा केला. मात्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दर महिन्याला पाठपुरावा केला.
  MIDC नेही सर्व खबरादरी घेतली.

 • 09 Oct 2021 13:16 PM (IST)

  चिपी विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

  कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले
  यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित
  तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन
  मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आगमन. पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले

  केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित
  केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीहून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित. खासदार विनायक राऊत हे सूत्रसंचालन करीत असून त्यांनी सर्वांचे स्वागत केले

   

 • 09 Oct 2021 13:13 PM (IST)

  Chipi airport : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात मंचावरही टशन

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते. यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. दोघांमधील राजकीय शत्रूत्व सर्वांना माहिती आहे, त्यातील टशन आज कोकणवासियांनी आणि महाराष्ट्राने पाहिली.

   

 • 09 Oct 2021 12:36 PM (IST)

  कोकणात चिपी विमानतळावर आज पहिलं विमान उतरणार, हे भाजपचं यश – प्रसाद लाड

  कोकणात चिपी विमानतळावर आज पहिलं विमान उतरणार!
  हे भाजपच्या नेतृत्वाच यश आहे. कोकणी माणसाच्या सन्मानासाठी आपण सदैव उभे आहात!
  धन्यवाद पंतप्रधान @narendramodi जी
  धन्यवाद मा. @MeNarayanRane साहेब!
  धन्यवाद मा. @Dev_Fadnavis साहेब!

 • 09 Oct 2021 12:28 PM (IST)

  सिंधुदुर्गवासियांच्या स्वप्नपूर्तीचा अभूतपूर्व सोहळा, कणकवलीत सेनेकडून चौकाचौकात लाईव्ह प्रक्षेपण

  सिंधुदुर्गवासियांच्या स्वप्नपूर्तीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी कणकवलीत शिवसेनेकडून लाईव्ह प्रक्षेपण

  पटवर्धन चौकात होणार लाईव्ह प्रक्षेपण

  ढोल ताशेसह होणार मोठा जल्लोष

 • 09 Oct 2021 12:05 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळावर दाखल

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळावर दाखल,

  उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरातही उपस्थित

  दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे चिपी विमानतळावर दाखल

 • 09 Oct 2021 12:01 PM (IST)

  नारायण राणे मुंबईवरुन चिपीकडे रवाना

  केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबईतून सिंधुदुर्गातील चिपीकडे जाणाऱ्या पहिल्या विमानात प्रवासासाठी जातानाचा फोटो

   

 • 09 Oct 2021 11:46 AM (IST)

  नारायण राणेंसह दिग्गजांचा मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास

  मुंबई – सिंधुदुर्ग पहिल्या विमानाची खास झलक
  नारायण राणेंसह दिग्गजांचा मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास
  शिवसेना-भाजपचे नेते एकाच विमानात
  सिंधुदुर्गात चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा
  मुख्यमंत्री आणि नारायण राणे एकाच मंचावर

 • 09 Oct 2021 11:37 AM (IST)

  शिवसेनेचे आमदार, खासदार विमानात एकत्र बसून चिपीकडे रवाना

  दुपारी 12.30 वाजता चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याअगोदर शिवसेनेचे मंत्री, नेते, आमदार, खासदार मुंबई विमानतळावरुन चिपीकडे रवाना झाले आहेत.

 • 09 Oct 2021 10:57 AM (IST)

  माझ्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होतंय, याचा अभिमान : नितेश राणे

  माझ्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतोय याचा अभिमान वाटतोय.

  कोकणातील जनतेला माहीत आहे की हे त्यांच्या दादानीच केलं आहे.

  पहिला शिवसेनेच्या वैभव नाईकांनी विरोध केला आणि नंतर ब्लास्टिंगचा ठेका मिळवला.

  शिवसेनेचे अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते मग त्यांनी का नाही परवानगी आणली,राणे साहेब केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनी अवघ्या60 दिवसात परवानगी आणली.

  बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येतो हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे.बाळासाहेब आज असते तर त्यांनी पाठीवर हात मारून सांगल असतं नारायण मला तुझा अभिमान आहे.

  फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या विमानतळासाठी फॉलोअप घेतला होता,त्यांना निमंत्रण देण्याऐवढी माणुसकीही यांच्यात नाही.म्हणून त्यांनी व दरेकरांनी बहिष्कार घातला आहे.याबाबत अधिक राणे साहेब आज बोलतील.

  चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय वरून छोटा झाला त्याला सर्वस्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई जबाबदार आहेत.

  विनायक राऊत यांनी त्यांच्या क्षमते एवढे बोलावं ते त्यांच्या तब्येतीसाठी ही चांगलं आहे.मोदीं साहेबांमुळे ते दोनदा खासदार झाले आहेत.

  केंद्रात सत्ता असताना अरविंद सावंत मंत्री बनले पण विनायक राऊत यांना मंत्री बनविण्याचा उद्धव ठाकरे यांनी विचार केला नाही.

  मुख्यमंत्र्यांनी अगोदर दोन तीन दिवस येऊन इथले प्रश्न सोडवले असते तर आम्हाला समाधान वाटले असते

 • 09 Oct 2021 10:50 AM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच वेळी मुंबई विमानतळावर दाखल

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच वेळी मुंबई विमानतळावर दाखल

  दोघेही वेगवेगळ्या गेटने मुंबई विमानतळावर दाखल

  मुख्यमंत्र्यांसोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित

  नारायण राणे सहकुटुंब चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याकडे रवाना

 • 09 Oct 2021 10:45 AM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंच्या आसनव्यवस्थेतील अंतर वाढवण्यात आले आहे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंच्या आसनव्यवस्थेतील अंतर वाढवण्यात आले आहे

  दोघांच्या आसनव्यवस्थेतील अंतर बदलण्यात आलं आहे

  दीड फुटाचं अंतर आता अडीच फुटांपर्यंत वाढवलं आहे

 • 09 Oct 2021 10:44 AM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंच्या आसन व्यवस्थेतील अंतर वाढवलं

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी एकाच मंचावर येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलं आहे. अशातच कार्यक्रमाला 2 तास राहिले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राणेंच्या आसनव्यवस्थेतील अंतर वाढविण्यात आलं आहे.

 • 09 Oct 2021 10:43 AM (IST)

  Chipi Airport : चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाला दिग्गजांची हजेरी

  सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. दुपारी 1 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  केंद्रीय मंत्री नारायण राणे
  सुभाष देसाई
  दादा भुसे
  प्रसाद लाड
  निरंजन डावखरे
  रवींद्र चव्हाण
  आदिती तटकरे
  अरविंद सावंत
  विनायक राऊत
  विनय नातू
  प्रमोद जठार
  सीताराम कुंटे
  संजय पांडे
  अवधूत तटकरे
  भाई गिरकर

 • 09 Oct 2021 10:40 AM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई विमानतळाकडे रवाना

  चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत. काहीच वेळात ते सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना होतील.

 • 09 Oct 2021 10:27 AM (IST)

  केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपी विमानतळाकडे रवाना

  केंद्रीय मंत्री नारायण राणे सहकुटुंब चिपी विमानतळाकडे रवाना झाले आहेत

  उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागतच करणार

  या कार्यक्रमाला आमच्याकडून कुठलाही गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊ

  तसेच, प्रहार सांगून होत नाही, योग्य वेळी योग्य गोष्टी सांगेन

   

 • 09 Oct 2021 10:09 AM (IST)

  श्रेयवादाची लढाई, उदय सामंत म्हणतात, कुणी काम केलंय, सर्वांना माहिती!

  मी दोन दिवस नियोजनात आहे. श्रेय वादापेक्षा कोकणवासीयांचे स्वप्न पूर्ण झाला यात समाधान असले पाहिजे. विमानतळासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. हे काम कशामुळे आणि कोणामुळे झाला आहे सिंधुदुर्गवासीयांना माहिती आहे, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

 • 09 Oct 2021 09:46 AM (IST)

  Chipi airport : भाजपने बहिष्कार टाकू नये : उदय सामंत

  उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

  मी दोन दिवस नियोजनात आहे. श्रेयवादापेक्षा कोकणवासीयांचे स्वप्न पूर्ण झालं, यात समाधान असले पाहिजे. विमानतळासाठी सर्वांनीच प्रयत्न केले.
  हे काम कशामुळे आणि कोणामुळे झालं आहे हे सिंधुदुर्गवासीयांना माहिती आहे.

  मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम फायनल झाला. बहिष्कार टाकू नये; हा संबंधित मंत्रायलाचा अपमान होईल.

  सिंधिया ऑनलाईन उपस्थित राहतात यात राजकारण नाही. कोणाचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही. आजचा कार्यक्रम राजकारण विरहित.

  प्रत्येकाकडे काही जंत्री तरी असेल तर ती त्यांनी सांगायला हरकत नाही, उदय सामंत यांचा राणेंना प्रत्युत्तर

 • 09 Oct 2021 08:54 AM (IST)

  चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण, 12 वर्षानंतर उद्धव-राणे एकाच मंचावर येणार

  कोकणाच्या विकासासाठी महत्त्वकांशी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज आहे. त्या निमित्तानं चिपी विमानतळाची मुख्य इमारत फुलांनी सजविण्यात आलीय. उद्घाटनाची संपूर्ण तयारी झाली असून 12 वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एका मंचावर येत असल्याने, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलंय

 • 09 Oct 2021 08:53 AM (IST)

  ज्योतिरादित्य सिंधिया यांची चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला ऑनलाईन उपस्थिती

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI