प्रसिद्ध गायक, संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना ‘कंठसंगीत’ पुरस्कार जाहीर, राज्य सरकाची घोषणा

कल्याणजी गायकवाड यांची संगीत क्षेत्रातील आपल्या वेगळ्या शैलीमुळे ते ओळखले जातात. त्यांनी संगीतबद्ध केलेले अभंग सुरेश वाडकर, अजय पोहनकर, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत यांनी गायिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या पुरस्काराचे लवकरच वितरण केले जाणार असून संगीत क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदर करण्यात येत आहे.

प्रसिद्ध गायक, संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना 'कंठसंगीत' पुरस्कार जाहीर, राज्य सरकाची घोषणा
संगीतकार कल्याणजी गायकवाड यांना कंठसंगीत पुरस्कार जाहीर
महादेव कांबळे

|

May 31, 2022 | 8:24 PM

मुंबईः महाराष्ट्र शासनाचा 2020-21 चा कंठसंगीत (Kanthsangeet Award) हा संगीतक्षेत्रातील मानाचा पुरस्कार गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड (Kalyanji Gaikwad) यांना जाहीर झाला आहे. गेल्या 30 वर्षापासून संगीत क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल आणि वारकरी सांप्रदायातील 1 हजारहून अधिक विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती आणि गायिका कार्तिकी गायकवाडचे (Kartiki Gaikwad) ते वडील आहेत. सध्या ते आळंदी येथे वास्तव्य करत असून आळंदीमध्येच ते संगीत कलासाधना करतात. शास्त्रीय गायक म्हणून ओळख असलेले आणि अभंगाच्या माध्यमातून ते घराघरात पोहचल आहेत. संगीत ही कला सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी अनेक गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना त्यांनी गुरुकुल पद्धतीने संगीत कला शिकवली आहे. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये व मानपत्राने त्यांचा गौरव केला जाणार आहे.

कल्याणजी गायकवाड हे गेल्या 30 ते 31 वर्षापासून ते संगीत कला क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. अनेक संतांचे अभंग त्यांनी गायिले असून महाराष्ट्रातील अनेक गावांमधून त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.

गुरुकुल पद्धतीने विद्यार्थी घडवतात

वारकरी संप्रदायातील संगीतकार आणि गायक अशी त्यांची ओळख असली तरी गुरुकुल पद्धतीने त्यांनी संगीत क्षेत्रात घडवलेले विद्यार्थी आज अनेक कार्यक्रमातून दिसत आहेत. संगीत कला ही सगळ्यांपर्यंत पोहचावी म्हणून त्यांनी गुरुकुल पद्धतीने विद्यार्थी घडवले आहेत. आज त्याच गुरुकुल परंपरेतली विद्यार्थ्यांनी कल्याणजी गायकवाड यांची परंपरा कायम ठेवत त्यांनीही आपले विद्यार्थी घडवण्यास प्रारंभ केला आहे.

बाबांचा नेहमीच आदर वाटतो

आपल्या बाबांना पुरस्कार जाहीर होताच, टीव्ही9 बरोबर बोलताना गायिकी कार्तिकी गायकवाडने सांगितले की, राज्य सरकारचा हा पुरस्कार मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची आणि मोठीच गोष्ट आहे. मात्र दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद हा आहे की माझ्या बाबांचे संगीत क्षेत्रातील विद्यार्थी आज तिसरी पिढीसाठी ते संगीत कला शिकवत आहेत. या दोन्ही गोष्टीमुळे आम्हाला नेहमीच आमच्या बाबांचा आदर वाटत राहील.

संगीत क्षेत्राची कित्येक वर्षं सेवा

मराठी साहित्यातील संतांचे अभंग कल्याणजी गायकवाड यांनी आपल्या वेगळ्या आवाजात आणि वेगळ्या शैलीत गावाघरात पोहचवले आहेत. त्यांनी ही संगीत साधना गेल्या तीस ते एकतीस वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या वेगळ्या शैलीमुळेच कल्याणजी गायकवाड यांना आकाशवाणीकडूनही ए ग्रेड संगीत सुगम संगीत प्राप्त झाले आहे.

सेवा म्हणून कार्यक्रमांचे आयोजन

वारकरी संप्रदायामध्ये कल्याणजी गायकवाड यांची वेगळी ओळख आहे. त्यामुळेच आळंदी आणि पंढरपूरमध्ये ते सेवा म्हणून कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्या या कार्यक्रमांना, त्यांचे अभंग ऐकण्यासाठी वारकरी संप्रदायाबरोबरच इतर क्षेत्रातील नागरिकांची अलोट गर्दी असते. हा कार्यक्रम दरवर्षी त्यांनी सेवा म्हणूनच आयोजित करत असतात.

अनेक अभंग संगीतबद्ध

कल्याणजी गायकवाड यांची संगीत क्षेत्रातील आपल्या वेगळ्या शैलीमुळे ते ओळखले जातात. त्यांनी संगीतबद्ध केलेले अभंग सुरेश वाडकर, अजय पोहनकर, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत यांनी गायिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या पुरस्काराचे लवकरच वितरण केले जाणार असून संगीत क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदर करण्यात येत आहे.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें