आघाडीनं धर्म पाळला नाही, तरीही ‘राजगडा’वर काँग्रेसची एक हाती सत्ता; काँग्रेसचे 17 च्या 17 उमेदवार विजयी

शिवसेनेनी आणि राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असा आरोप संग्राम थोपटेंनीं केला आहे. त्याचनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये एकला चलो रे चा नारा दिला असून, जे आदेश पक्षश्रेष्ठी देतील त्याची अंमलबजावणी करून निवडणुका लढवू असंही संग्राम थोपटे यांनी सांगितले आहे.

आघाडीनं धर्म पाळला नाही, तरीही 'राजगडा'वर काँग्रेसची एक हाती सत्ता; काँग्रेसचे 17 च्या 17 उमेदवार विजयी
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 6:50 PM

भोरः पुण्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या (Rajgad Sahakari Sakhar Kakhana) संचालक पदासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंसह (MLA Sangram Thopte) 17 च्या 17 जागांवर काँग्रेसचे उमेदवार (C0ngress Leader) निवडून आले आहे. सर्व पक्ष विरोधात असूनही काँग्रेसचा एक हाती विजय झाला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. दरम्यान विजयानंतर बोलताना राज्यात आघाडीचं सरकार असूनही स्थानिक पातळीवर आघाडीचा धर्म पाळला जातं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेनी आणि राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असा आरोप संग्राम थोपटेंनीं केला आहे. त्याचनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये एकला चलो रे चा नारा दिला असून, जे आदेश पक्षश्रेष्ठी देतील त्याची अंमलबजावणी करून निवडणुका लढवू असंही संग्राम थोपटे यांनी सांगितले आहे.

एकला चलो रे चा नारा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये एकला चलो रे चा नारा दिला आहे. जे आदेश पक्षश्रेष्ठी देतील त्याची अंमलबजावणी करून निवडणुका लढवू असं संग्राम थोपटे यांनी म्हंटले आहे. निवडणूक बिनविरोध झाली असती तर निवडणूकीचा खर्च वाचला असता, मात्र विरोधकांनी ते ऐकलं नाही, आणि आता मतदारांनी कौल देऊन त्यांचं डिपॉजिटसुद्धा जप्त करून त्यांची जागा दाखवली असही मतं व्यक्त करण्यात आले आहे.

मोठा बंदोबस्तही तैनात

भोरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मतमोजणी करण्यात आली, भोरचे प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामं पाहिले. मतमोजणीसाठी 15 टेबल ठेवण्यात आले होते, तर यावेळी मतमोजणीसाठी 100 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. निकालाच्या पार्श्श्वभूमीवर 4 अधिकारी आणि 40 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

तालुक्यातील 29 मतदान केंद्रांवर मतदान

29 तारखेला घेण्यात आलेल्या मतदानामध्ये 29 मतदान केंद्रांवर 43.96 टक्के इतकं मतदान झाले होतं. यामध्ये यासाठीचं मतदान भोर, वेल्हा, खंडाळा, हवेली तालुक्यातील 29 मतदान केंद्रांवर घेण्यातं आले. एकूण 13 हजार 618 मतदारांपैकी 5 हजार 987 मतदारांनी आपला हक्क बजावला, यामध्ये 667 महिला तर 5 हजार 320 पुरुष मतदारांचा समावेश होता.

शेवटच्या दिवशी 19 जणांची माघार

निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 19 जणांनी अर्ज माघारी घेतल्याने, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंसह 10 जण बिनविरोध संचालक म्हणून निवडून आले होते. 10 जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या 7 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली.

विजयी उमेदवार

संग्राम थोपटे, दत्तात्रय चव्हाण, किसनराव सोनवणे, विकास कोंडे, शिवाजी कोंडे, अशोक शेलार, सुरेखा निगडे,शोभा जाधव, संदीप नगिने, चंद्रकांत सागळे हे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, पोपटराव सुके, सोमनाथ वचकल, सुधीर खोपडे, दिनकर धरपाळे, प्रताप शिळीमकर हे उमेदवारी मतमोजणीमध्ये विजयी झाले आहेत.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.