Kasturba Hospital | कस्तुरबा रुग्णालयाचं शतक, शंभरावा रुग्ण बरा करुन घरी पाठवला

Namrata Patil

|

Updated on: Apr 21, 2020 | 7:39 PM

'संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी देशभरातील सर्वात जुन्या रुग्णालयांपैकी (Kasturba Hospital Corona Patient Recover) एक अशी कस्तुरबा रुग्णालयाची ओळख आहे.

Kasturba Hospital | कस्तुरबा रुग्णालयाचं शतक, शंभरावा रुग्ण बरा करुन घरी पाठवला

मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाचे 3 हजार 032 हजार रुग्ण आढळले (Kasturba Hospital Corona Patient Recover) आहेत. तर आतापर्यंत 139 जणांचा मृत्यू झाला आहे. पण सुदैवाने संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातून कोरोनाचा 100 वा रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

‘संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी देशभरातील सर्वात जुन्या रुग्णालयांपैकी (Kasturba Hospital Corona Patient Recover) एक अशी कस्तुरबा रुग्णालयाची ओळख आहे. याच रुग्णालयातून कोरोनाचा शंभरावा रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकाने घरी परतण्यापूर्वी कस्तुरबा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत 100 रुग्ण पूर्णपणे घरी परतले आहेत. यात 24 ज्येष्ठ नागरिकांचा तर दहा वर्षाखालील 7 बालकांचाही समावेश आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाने ‘करोना कोविड १९’ या आजाराशी सुरू असलेल्या लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत कोरोनाच पहिला रुग्ण आढळला होता. त्या दिवसापासून हे रुग्णालया कोरोनाबाधित रुग्णांना अव्याहतपणे सेवा देण्यात अग्रेसर आहे. या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, कामगार, कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र एक करून रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत.

कस्तुरबा रुग्णालयातून आतापर्यंत 100 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात 60 पुरुष आणि 40 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 60 वर्षावरील वय असणाऱ्या 24 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर 10 वर्षाखालील 7 बालकांचाही बरे होऊन घरी परतलेल्यांमध्ये (Kasturba Hospital Corona Patient Recover) समावेश आहे.

मुंबई उपनगरातील 75 रुग्ण बरे

तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरातील रुग्णालयांतून कोरोनाचे 75 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात सर्वाधिक 30 रुग्ण हे जोगेश्वरी परिसरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील आहेत.‌

त्यापाठोपाठ कुर्ल्यातील खान बहादुर भाभा रुग्णालयातून 22, तर घाटकोपरमधील राजावाडी परिसरातील ‘सेट वाडीलाल छत्रभुज गांधी आणि मोनजी अमिदास व्होरा रुग्णालयातून 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

तर कांदिवली पश्चिम परिसरातील ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातून’ 3 रुग्ण, वांद्रे पश्चिम परिसरातील खुरशादजी बेहरामजी भाषा रुग्णालयातून 2 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यानुसार महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधून आतापर्यंत 75 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

संबंधित बातम्या :

गुड न्यूज! एका दिवसात 705 ‘कोरोना’ग्रस्त बरे

स्पेशल रिपोर्ट : मुंबईत दाटवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा फैलाव का वाढतोय?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI