स्पेशल रिपोर्ट : मुंबईत दाटवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा फैलाव का वाढतोय?

कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वेगाने पसरत असताना दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये (Mumbai Corona Virus Spread) कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे.

स्पेशल रिपोर्ट : मुंबईत दाटवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा फैलाव का वाढतोय?
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 4:47 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वेगाने पसरत असताना दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये (Mumbai Corona Virus Spread) कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. वरळी कोळीवाडा जवळ असलेल्या जनता कॉलनी या वसाहतीत कोरोनाचे 76 रूग्ण आढळले आहेत. तर 4 चार जणांचा मृत्यू झाल्याची धकादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या दाटवाटीच्या वस्त्यामध्ये कोरोना कसा पसरतो, याबाबत टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

जनता कॉलनी वसाहतीत निमुळत्या छोट्या छोट्या गल्ल्या आहे. भुयाऱ्या सारख्या (Mumbai Corona Virus Spread) गल्ल्यामध्ये या ठिकाणचे नागरिक राहत आहेत. आज या गल्ल्या ओस पडल्या आहे. या भागात 76 कोरोना रुग्ण आढळल्याने हा भाग रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा भाग संपूर्ण पोलीस नियंत्रणाखाली असून इथला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

जनता कॉलनीत जवळपास 25 ते 30 हजार लोक अत्यंत दाटीवाटीनं राहतात, असे या ठिकाणच्या नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी सांगितलं. मात्र प्रशासन पूर्ण काळजी घेत असून आम्ही नागरिकांना बाहेर न पडण्याची विनंती केली आहे, असेही हेमांगी वरळीकर यांनी सांगितलं.

जनता कॉलनीत कोरोना वेगाने पसरण्यामागे तीन कारणं आहेत. दाटीवाटीने एकमेकांना लागून असलेली घर, निमुळत्या गल्ल्या आणि शौचासाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे.

जनता कॉलनीतील नागरिक प्रशानाला सहकार्य करत आहेत. आम्हाला जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा झाल्याचं येथील नागरिक सांगतात. दादर पोलीस, एनजीओ आणि शिवसेनेच्या माध्यामातून या भागात अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं आहे . नागरिकांना अडचण येऊ नये यांची काळजी प्रशासन घेत आहे

जनता कॉलनीसारख्या अनेक दाटीवाटीच्या वस्त्या मुंबईत आहेत. मुंबईतील अशा दाटीवाटीची वस्त्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. अशा वस्त्या कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या उपायोजनांसोबतच या वसाहतीमधल्या नागरिकानी नियमाचं पालन करणं महत्वाचं (Mumbai Corona Virus Spread) असणार आहे.

संबंधित बातम्या : 

CISF च्या जवानांनी कोरोनाला गाडलं, 6 जवान कोरोनामुक्त, पनवेलमध्ये 10 जणांना डिस्चार्ज

Pune Corona Update : पुण्यात ससून, भारती आणि नायडू रुग्णालयातील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.