Ketaki Chitale : केतकी चितळेवर असेही आरोप, स्विगीवाल्याचे पैसे न दिल्यापासून ते वादग्रस्त पोस्टपर्यंत, केतकीचे शेजारी म्हणतात…

कोर्टाने तिला पुन्हा पाच दिवसांची कोठडी सुनावली. मात्र केतकीविरोधात फक्त एवढ्याच तक्रारी नाही. तर राज्यभरात तिच्याविरोधात जवळपास 20 गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे केतकी चितळेच्या शेजाऱ्यांनीही तिच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला आहे.

Ketaki Chitale : केतकी चितळेवर असेही आरोप, स्विगीवाल्याचे पैसे न दिल्यापासून ते वादग्रस्त पोस्टपर्यंत, केतकीचे शेजारी म्हणतात...
अभिनेत्री केतकी चितळेImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 4:49 PM

मुंबई : शरद पवारांबाबत (Sharad Pawar) एक वादग्रस्त पोस्ट केली आणि केतकी चितळेची (Ketaki Chitale) जेलवारी सुरू झाली. सुरूवातील केतकी चितळेला नवी मुंबईतल्या कळंबोली पोलिसांनी (Navi Mumbai Police) अटक केली, त्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ठाणे कोर्टानं केतकीला तीन दिवासांची पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडी संपताच केतकीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिला पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावाली. मात्र हे प्रकरण इथेच थाबलं नाही. तर दुसऱ्याच दिवशी केतकीचा ताबा हा नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी एका जुन्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात घेतला. त्यानंतर कोर्टाने तिला पुन्हा पाच दिवसांची कोठडी सुनावली. मात्र केतकीविरोधात फक्त एवढ्याच तक्रारी नाही. तर राज्यभरात तिच्याविरोधात जवळपास 20 गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे केतकी चितळेच्या शेजाऱ्यांनीही तिच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला आहे.

ऑर्डर घेऊन पैसे न दिल्याचा आरोप

अनेक कंपन्या आता घरपोच फूड डिलिव्हरी करतात. केतकीकडे ज्या कंपनीचे लोक फूड डिलिव्हरीसाठी येत त्यांच्याशी तिचे अनेकदा खटके उडाल्याचे काही जणांनी सांगितले आहे. फूड डिलिव्हरी करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याशी ती वाद घालत असे, तसेच त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन अनेकदा पैसे देताच त्यांना परत पाठवल्याचा दावाही सोसायटीतील लोकांनी केला आहे. त्यामुळे केतकीच्या स्वभावारून अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

सोसायटीच्या निर्णयांनाही विरोध

केतकी राहत असलेल्या रोडपाली परिसरातील सोसायटीतील रहिवाश्यांशी संवाद साधला असता त्यांनी काही धक्कादायक गोष्टींचा दावा केला आहे. केतकीचं वागणं सोसयटीवाल्यांशी आणि इतरांशीही ठीक नसल्याचे तिच्या सोसायटीतील लोकांनी सांगितलं आहे. ती शेजाऱ्यापाजाऱ्यांशी जास्त बोलत नाही. सोसायटीच्या निर्णयांनाही केतकीने अनेकदा विरोध केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ज्या मिटिंगमध्ये ती नसते त्या मिटिंगमधील निर्णयाला तर तिचा विरोध ठरलेलाच असतो अशी तक्रार त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

केतकीविरोधात जवळपास 20 गुन्हे दाखल

केतकीला इतर ठिकाणच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं तर तिचा कोठडी मुक्काम हा आणखी वाढणार आहे. कारण गोरेगाव, पवई, भोईवाडा, ठाण्यातील कळव्यात, नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये, कळंबोली, पुणे, पिंपरी चिंचवड, देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, यवतमाळमध्येही केतकीवर गुन्ह्याची नोंद झालीय. या ठिकाणचे पोलीसही नवी मुंबई पोलिसांनंतर केतकीला ताब्यात घेण्याची शक्यत आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी किती लांबणार सध्या तरी सांगणं कठीण आहे.

Non Stop LIVE Update
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.