खारमधील तरुणीच्या हत्येमागे लव्ह ट्रँगलचा संशय, न्यू इयर पार्टीत ‘काय घडलं त्या रात्री?’

अनिश बेंद्रे

|

Updated on: Jan 02, 2021 | 11:28 AM

आरोपी श्रीने मयत जान्हवीला फसवून दियासोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. Khar Janhavi Kukreja Murder

खारमधील तरुणीच्या हत्येमागे लव्ह ट्रँगलचा संशय, न्यू इयर पार्टीत 'काय घडलं त्या रात्री?'
Follow us

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या किशोरवयीन तरुणीच्या हत्याकांडाने मुंबई हादरली आहे. खार परिसरात हायप्रोफाईल सोसायटीत जोडप्याने केलेल्या मारहाणीत 19 वर्षीय तरुणीला प्राण गमवावे लागल्याचे बोलले जाते. संबंधित टीनएजर कपलला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर वाद झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र पोलिसांना यामागे प्रेमाचा त्रिकोण असल्याचा संशय आहे. (Khar Janhavi Kukreja Murder Case killed after alleged fight with teenage couple)

खार परिसरात भगवती हाईट्स या गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर गुरुवार 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत इमारतीतील रहिवाशांसोबत त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईकही सहभागी झाले होते. या पार्टीत अनेकांनी मद्यपानही केले होते.

मयत 19 वर्षीय जान्हवी कुकरेजा ही 22 वर्षीय संशयित आरोपी श्री जोगधनकर आणि 19 वर्षीय दिया पाडणकर यांच्यासोबत पार्टीला आली होती. जान्हवी सांताक्रुझला राहत होती, तर दोन्ही संशयित आरोपी खारचेच रहिवासी होते.

काय घडलं त्या रात्री?

खारमधील भगवती हाईट्स इमारतीच्या गच्चीवर न्यू इयर पार्टी सुरु होती. पार्टीत चाललेल्या म्युझिकच्या ठणाण्यातच उपस्थितांना जान्हवी, श्री आणि दिया यांच्यात बाचाबाची होताना दिसली. कुठल्या कारणावरुन वादाची ठिणगी पडली, हे कोणालाच समजत नव्हतं.

जान्हवीच्या केसांना पकडून संशयित जोडप्याने तिला फरफटत गच्चीपासून दुसऱ्या मजल्यापर्यंत नेल्याचा दावा जान्हवीच्या जवळच्या मित्रांनी केला आहे. पायऱ्यांवर रक्ताचे थेंब आढळल्याचीही प्राथमिक माहिती आहे. (Khar Janhavi Kukreja Murder Case killed after alleged fight with teenage couple)

इस अँगल मे लव्ह ट्रँगल?

श्रीने जान्हवीला फसवून दियासोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा लव्ह ट्रँगल असल्याचं पोलिसांना प्रथमदर्शनी वाटतं. पोलिसांनी श्री आणि दियाला ताब्यात घेतलं आहे. 22 वर्षीय श्री जोगधनकर या प्रकरणात मुख्य संशयित आहे. श्रीच्या डोक्याला आणि पाठीला जखमा झाल्या आहेत.

पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. जान्हवी दोन्ही संशयितांसह मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास पार्टीच्या मध्यातच बाहेर पडताना दिसली. तर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ती इमारतीच्या परिसरातच मृतावस्थेत आढळली. जिन्यावरुन तिला खाली ढकलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदे आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारपर्यंत हत्येचा गुंता सुटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

(Khar Janhavi Kukreja Murder Case killed after alleged fight with teenage couple)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI