AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या चौकशीचे चार दिवस, आजपासून मुहूर्त, आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडमध्ये

ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आरोपांची राळ उडवून देत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जेरीस आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यामागेही आता चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या चौकशीचे चार दिवस, आजपासून मुहूर्त, आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडमध्ये
किरीट सोमय्या
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 10:13 AM
Share

मुंबईः ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आरोपांची राळ उडवून देत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जेरीस आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यामागेही आता चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे. सोमय्या पहिल्यांदा सेव्ह विक्रांत मोहिमेमुळे (toilet scam) अडचणीत आले. याप्रकरणी त्यांनी न्यायलयाचा दरवाजा ठोठावत अटकपूर्व जामीन मिळवला. मात्र, आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (sanjay raut) सोमय्यांच्याविरोधात टॉयलेट घोटाळ्याचा बार फोडलाय. या आरोपामुळे पुन्हा खळबळ उडाली असून, आजपासून सोमय्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होतेय. आर्थिक गुन्हे शाखा त्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपात काही तथ्य नाही. त्यांच्याकडे एकही कागद नाही, असा दावा सोमय्या यांनी केला खरा. मात्र, नगरविकासाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्र लिहून कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधा, असे साकडे घातले. त्यामुळे सोमय्यांच्या आगतिकपणा दिसला.

काय आहे टॉयलेट घोटाळा?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये टॉयलेट घोटाळ्याची कागदपत्रे पत्रकारांना दाखवली. ते म्हणाले की, मी सेव्ह विक्रांत घोटाळ्यातल्या आरोपीचा शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढलाय. माणसे टॉयलेटमध्ये सुद्धा पैसे खाऊ शकतात, असे सांगून त्यांनी मीरा-भाईंदर पालिकेच्या आयुक्तांच्या अहवालाचा उल्लेख केला. किरीट सोमय्या, त्यांची पत्नी आणि मुलाचे युवा प्रतिष्ठान नावाची एनजीओ आहे. या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खोटी बिले तयार केली. कांदळवनाची बेकायदेशीरपणे कत्तल करून तिथे निधी वापरला. महापालिकांचे कोट्यवधी रुपये हडप केले. यासंदर्भातले कागद इथे आहेत. या कागदावरतीच गुन्हा दाखल होणारय. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा अटकपू्र्व जामिनासाठी जावे लागेल. आपल्याला आज ना उद्या अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या बाजूच्या कोठडीत रहावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

चौकशीचा ससेमिरा…

किरीट सोमय्यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केलेत. त्यावर 2022 मध्ये राजभवनातून माहिती मागवली. तेव्हा तिथे हे पैसे जमा केले नसल्याचे समजते. याप्रकरणी काही निवृत्त लष्करी जवानांनी तक्रार दाखल केली. मात्र, कोर्ट म्हणते 2013 च्या प्रकरणी आता गुन्हे दाखल होतायत. हे दिलासा कोर्ट आहे. कारण ते विशिष्ट पक्षांच्या नेत्यांना दिलासा देते. पण हे पूर्णतः चुकीचंय. कारण आतापर्यंत पैशाचा अपहार झाल्याचे उघड झाले नव्हते. ते आता समोर आले आहे. आम्ही 58 कोटींचा हिशेब मागतोय. मात्र, हा आकडा कुठून आणला असे आरोपी म्हणतोय. आमचे असे म्हणणे आहे की, 58 कोटी की, 158 कोटी हे पोलीस तपासात निष्पण्ण होईल, असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय. या साऱ्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांची होणारी चौकशी त्यांच्या अडचणीत भर घालू शकते.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.