मविआचे नेते चौकशीच्या फेऱ्यात, मुख्यमंत्री आणि शरद पवार त्यावर गप्प का?: किरीट सोमय्यांचा सवाल

महाविकास आघाडी सकारमधील मंत्री आणि नेत्यांची विविध प्रकरणं यावरुन किरीट सोमय्यांनी निशाणा साधला आहे. Kirit Somaiya slams Maha Vikas Aghadi

  • आनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:20 PM, 13 Jan 2021
Kirit Somaiya Maha Vikas
शरद पवार, किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी विरोधात आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सकारमधील मंत्री आणि नेत्यांची विविध प्रकरणं यावरुन किरीट सोमय्यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काही नेते ईडीच्या फेऱ्यात अडकत आहेत. सध्या काही नेत्यांचे नातेवाईक एनसीबीच्या रडार वर आहेत .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांना एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या सर्व प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे गप्प का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya slams Maha Vikas Aghadi over many leaders caught in ED and other cases)

किरीट सोमय्यांनी धनंजय मुंडे प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीनं पाठवलेले समन्स यावरुन देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडेच्यावर एका तरुणीनं बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांवर बंगले लपवण्याचा आरोप करण्यात आलाय, तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जातोय. ठाकरे सरकारची किती दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय, इथली अस्मिता काय, या सगळ्यावर पाणी फिरवण्याचं काम ठाकरे सरकार करीत आहे”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं समन्स पाठवलं आहे. नवाब मलिक यांनी जावयाच्या ड्रग कनेक्शन वर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली. किरीट सोमय्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आज सलग दोन ट्विट केली आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स आल्याचं सांगितलं. तर दुसऱ्या ट्विटमध्ये किरीट सोमय्यांनी थेट नवाब मलिक यांच्या नावाचा उल्लेख करत ‘नवाब मलिक जबाव दो’ असं आव्हान दिलं आहे.

किरीट सोमय्यांचे ट्विट

समीर खान यांना एनसीबीचे समन्स

मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं समीर खान यांना समन्स बजावलं असल्याची माहिती आहे. नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला असल्याची माहिती आहे. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचं सांगितलं जातंय.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

सोमय्यांच्या निशाण्यावर सरनाईक, विहंग गार्डन प्रकरणी पोलिसात तक्रार

(Kirit Somaiya slams Maha Vikas Aghadi over many leaders caught in ED and other cases)