Ladki Bahin Yojana :164 कोटींचा दरोडा?; लाडक्या भाऊरायांनी असा डल्ला मारला, सरकार वसुली करणार का, अपडेट काय?

Ladki Bahin Yojana eKYC : लाडकी बहीण योजनेत अजूनही काही गरजू महिलांना विविध अडचणींमुळे वंचित रहावे लागले आहे. तर लाडक्या भाऊरायांनी या योजनेत हात धुवून घेतले आहे. या योजनेत 164 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. काय आहे अपडेट?

Ladki Bahin Yojana :164 कोटींचा दरोडा?; लाडक्या भाऊरायांनी असा डल्ला मारला, सरकार वसुली करणार का, अपडेट काय?
लाडकी बहीण योजना
| Updated on: Oct 22, 2025 | 2:33 PM

Ladki Bahin Yojana Brother Intrusion : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने सत्तेची समीकरणं बदलवण्यात मोठा हातभार लावल्याचे मानण्यात येते. ही योजना महायुतीसाठी की फॅक्टर ठरली. लाडकी बहीण योजनेत काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या. पण सुरुवातीच्या अनागोंदीमुळे या योजनेत लाडक्या भाऊरायांनी घुसखोरी करत 1500 रुपयांचे अनेक हप्ते गुपचूप पचवले. पण आता ई-केवायसी आणि खात्यांच्या तपासणीत धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या योजनेत थोडा थोडका नव्हे तर 164 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

लाडके भाऊ योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायम चर्चेत आहे. विरोधकांनी तर राज्याच्या तिजोरीवर अधिक्रमण करणारी योजना म्हणून तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर आता माहितीच्या अधिकारात या योजनेत महाघोटाळा झाल्याचे समोर आले आहे. सरकारने पुरवलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात या योजनेत 12 हजार 431 पुरूषांनी घुसखोरी करत 1500 रुपयांचा हप्ता गटकावला आहे.

इतक्या पुरुषांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असतानाही त्यांच्यावर अद्याप कोणतेही कारवाई झाले नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणच संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. आता पुरुषांच्या नावावर अधिकाऱ्यांनी आणि काही राजकीय कार्यकर्त्यांनी तर मलिदा लाटला नाही ना? असा गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. इतका मोठा घोटाळा झाला असताना सरकारची त्यावरील चुप्पी अनेकांना खटकत आहेत. या योजनेत आधार कार्ड, बँकेचा तपशील सरकारकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कुणीजरी कसल्याही पद्धतीने मिळवला असला तरी ती व्यक्ती सुटू शकत नाही, मग कारवाई का झाली नाही असा प्रश्न विचारल्या जात आहे.

164 कोटींचा दरोडा

या योजनेतून सरकारच्या तिजोरीवर 164 कोटींचा दरोडा घातल्याचे समोर आले आहे. 12 हजार 431 पुरुषांनी 12 महिन्यांचा लाभ पदरात पाडून घेतला तर 77 हजार 980 अपात्र लाभार्थी महिलांनी 13 महिन्यांचा लाभ मिळवल्याचे समोर आले आहे. म्हणजे जवळपास वर्षभर या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये महिना जमा होत होता. या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवर 164 कोटींचा दरोडा घालण्यात आल्याचे समोर येत आहे.