Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता, ekyc साठीची ती अट शिथील
Ladki Bahin Yojana ekyc : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता धडकली आहे. ई-केवायसी या महिन्यातच पूर्ण करावी लागणार आहे. पण ई-केवायसी प्रक्रियेतील ही एक महत्त्वाची अट शिथिल झाल्याने या लाडक्या बहिणींचा जीव भांड्यात पडला आहे.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. लाभार्थींसाठी एक आनंदवार्ता आली आहे. ई-केवायसीची मुदतवाढ याच महिन्यात संपणार आहे. लाभार्थ्यांसाठी ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतरचे सर्व हप्ते ईकेवायसी केली नसेल तर थांबवण्यात येतील. फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांना अटकाव करण्यासाठी या योजनेत ईकेवायसीची बंधन आणण्यात आले आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यात पती अथवा वडील नसलेल्या लाभार्थ्यां महिलांची मोठी अडचण झाली होती.
या योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासरपोर्ट साईज फोटो, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावा लागणार आहे. तरच eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. पण ज्या महिलांचे वडील/पती हयात नाहीत, त्यांची अडचण होत होती. त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर शासनाने त्याची दखल घेतली.
अट शिथील, पण ईकेवायसी प्रक्रिया करावी लागेल पूर्ण
लाडकी बहीण योजनेत पती अथवा वडीलांचे आधार कार्ड जोडणे, अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण ज्यांचे पती अथवा वडील हयात नाही. त्या लाडक्या बहिणींची अडचण ओळखून सरकारने ईकेवायसी प्रक्रियेत थोडी शिथिलता आणली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यात एक मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. आता याप्रकरणात महिलांना पती अथवा वडील नसेल तर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने याविषयीची अपडेट दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
ई-केवायसी प्रक्रिया
लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्या
लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) नोंदवा
आता कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा
आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करा
आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद का. Submit करा
आता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे
नवीन नियमानुसार पती, वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP नमुद करा
आता लाभार्थी लाडक्या बहिणीचा जात प्रवर्ग निवडा
आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर (Declaration) क्लिक करा
आता संपूर्ण माहिती एकदा वाचा. सबमिट बटन क्लिक करा.
e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.
