AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात ‘जन आक्रोश’; दोन मोठ्या मोर्चांनी मुंबई दणाणणार; काय आहेत मागण्या?

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये धर्मगुरूंसह लिंगायत समाजातील नेते मंडळी सहभाग होणार आहेत.

शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात 'जन आक्रोश'; दोन मोठ्या मोर्चांनी मुंबई दणाणणार; काय आहेत मागण्या?
फाईल फोटोImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 29, 2023 | 9:25 AM
Share

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत आज दोन मोठे मोर्चे निघणार आहेत. त्यामुळे मुंबई ढवळून निघणार आहे. आज सकल हिंदू समाजाकडून दोन हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातील एक मोर्चा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरून सुरू होईल आणि कामगार मैदानावर पार पडणार आहे. तर दुसरा मोर्चा हा लिंगायत समाजाचा असेल. लिंगायत समाजाकडून विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. लव्ह जिहाद ते लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी हे मोर्चे काढण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन मोठ्या मोर्चांनी मुंबई दणाणून जाणार आहे.

लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यात यावेत व धर्मांतर कायदा देशात लागू करावा, या मागणीसाठी आज मुंबईत सकल हिंदू समाजामार्फत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. दादर येथील शिवाजी पार्कमधून 10 वाजता मोर्चाला सुरवात होईल व कामगार मैदान येथे मोर्चाची सांगता होईल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कामगार मैदान परिसरात पोलिसांचा पॉईंट टू पॉईंट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मैदानात बॅनर्सही लावण्यात आले आहेत.

या आहेत मागण्या

श्रद्धा वालकर हत्याकांडचा आरोपी आफताबला जन्मठेप व्हावी, लव्ह जिहाद विरोधी कायद्याची अंमलबजावणी आणि धर्मांतरण कायदा देशात लागू व्हावा म्हणून हा मोर्चा काढण्यात येत आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचंही नियमन करण्यात आलं आहे.

लिंगायत समाजाचा महामोर्चा

दरम्यान, लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये धर्मगुरूंसह लिंगायत समाजातील नेते मंडळी सहभाग होणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 10 हजार लिंगायत समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव यांनी दिली.

तसेच या राज्यव्यापी मोर्चामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तेलंगणा राज्यातील समाजबांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आझाद मैदानावर सकाळपासूनच लिंगायत समाजाचे बांधव जमा होताना दिसत आहेत.

काय आहेत मागण्या?

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी

राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहिर करावा

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे

मुंबई येथील विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे

गाव तेथे रुद्रभुमी ( स्मशानभुमी) आणि गाव तेथे अनुभव मंटप ( सभामंडप ) करण्यात यावे

लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करण्यात यावे

राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावा

वीरशैव लिंगायत आणि हिंदू लिंगायत अशी नोंद असलेल्यांचा ओबीसी घटकामध्ये समावेश नाही, त्यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सरकारी नोकरीची संधी मिळत नाही. सरकारने शुध्दीपत्रक काढून समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच