BJP : मिनी मंत्रालयासाठी भाजपाची मोर्चे बांधणी; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी फुंकले रणशिंग

BJP Mahavijay Campaign 3.0 Mini Ministry Mission : लोकसभेचा पराभव पार धुळीस मिळवणाऱ्या भाजपाचे मनोबल आता सर्वाधिक आहे. भाजपाला संघाचे बौद्धिक लाभल्याचा फायदा विधानसभेत दिसून आला. मिनी मंत्रालयासाठी भाजपाने आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

BJP : मिनी मंत्रालयासाठी भाजपाची मोर्चे बांधणी; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी फुंकले रणशिंग
भाजपाची स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मोर्चेबांधणी
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 10:34 AM

लोकसभेतील पराभवाचा कलंक भाजपाने भरघोस मतांआधारे धुवून काढला. विधानसभेतील संघाचे बौद्धिक भाजपाच्या कामी आले. मायक्रो प्लॅनिंग, लाडकी बहीण योजनेने अफाट असा विजय मिळवून दिला. या विराट दर्शनानंतर आता भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आतापासूनच मैदानात उतरली आहे. मिनी मंत्रालयासाठी भाजपाने आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजपच्या महाविजय 3.0 अभियानास उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यामुळे मित्र पक्षांसह विरोधकांसाठी हा आलर्म आहे.

मिनी मंत्रालयासाठी फुंकले रणशिंग

राज्यातील मिनी मंत्रालयासाठी भाजपाने रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या महाविजय 3.0 अभियानास उद्यापासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत. दुसर्‍या बैठकीत फडणवीस हे भाजपच्या सर्व आमदार व मंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. मिनी मंत्रालयासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केल्याने इतर पक्षांना पण आता बांधणी सुरू करावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

उद्या शिर्डीत भाजपाचे राज्य अधिवेशन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे निवडणुकीसाठी सर्व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतील. पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने होईल. दुसर्‍या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील. उद्या दिवसभर भाजप नेत्यांचे विचार मंथन होईल. अधिवेशनाचा समारोप हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने होईल.

काय असेल या अधिवेशनात?

विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात महाविजय 3.0 ची घोषणा केली जाईल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी रणनिती आखली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अभिनंदन प्रस्ताव संमत केला जाईल.

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजपाने आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीपर्यंत भाजपाचा टक्का वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. अर्थात ही निवडणूक सत्तेतील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील की एकत्र लढतील हे समोर आलेले नाही.

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.