115 दिवस पुरेल इतका धान्यपुरवठा, देहविक्रीतील महिलांच्या मदतीसाठी मंत्री यशोमती ठाकूर धावल्या

मंत्री यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्री व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले होते.

115 दिवस पुरेल इतका धान्यपुरवठा, देहविक्रीतील महिलांच्या मदतीसाठी मंत्री यशोमती ठाकूर धावल्या

मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला (Lockdown Effect On Prostitutes) आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांसमोर उदर्निवाहाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापैकी एक म्हणजे, देहविक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिला. ‘कोविड-19’ परिस्थितीत या महिलांचे उत्पन्न बंद झाल्याने त्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्री व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आत्तापर्यंत सुमारे साडेबारा हजार महिलांपर्यंत पोहोचत त्यांच्या (Lockdown Effect On Prostitutes) पोटापाण्याची व्यवस्था राज्य शासनाने केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात देहविक्री करणाऱ्या महिलांपुढे गंभीर समस्या उभी राहिली आहे. हे लक्षात येताच यशोमती ठाकूर यांनी तात्काळ विभागाच्या सचिव, महिला आणि बालविकास आयुक्त आदींसह व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना या महिलांना मदत उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रणा त्वरित गतिमान करण्याचे निर्देश दिले. या कामात स्वयंसेवी संस्थांनीही शासनासोबत काम करत खूप चांगले सहकार्य केले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर या शहरात देहविक्री व्यवसायातील महिला मोठ्या संख्येने आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील कामाठीपुरा, फोकलँड, खेतवाडी, काँग्रेस हाऊस, सिप्लेक्स बिल्डिंग, अंटॉप हिल, पारस रोड, दामोदर मॅन्शन या क्षेत्रात देहविक्री करणाऱ्या महिला राहतात. या महिलांच्या मुलांसाठी दिवसरात्र खुली निवारागृहे चालविली जात आहेत. शासनासोबतच सामाजिक संस्था त्यांच्यासाठी काम करत असून महानगरपालिकेमार्फत अन्नाचे डबे त्यांच्यापर्यंत पोहोचविले जात आहेत.

या महिलांना पुढील 115 दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे किट पुरविण्यात आले असून त्यानंतरही महिनाभराचे रेशन पुरविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सॅनिटायजर्स, सॅनिटरी किट, सोया बिस्किटे आणि इतर खाद्य वस्तू या वस्त्यांमध्ये पुरविण्यात येत आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्यावतीने मोफत सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘एचआयव्ही’ग्रस्त महिलांसाठी ‘एआरटी’ उपचारपद्धती सुरु असून नियमीतपणे औषधे पुरविण्यात (Lockdown Effect On Prostitutes) येत आहेत.

पुणे जिल्ह्यात सुमारे 2 हजार 500 महिला देहविक्री व्यवसायात असून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत अन्नधान्य, रेशन किट, सॅनिटरी किट पोहोचवले. फरासखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात विशेष भूमिका बजावली. तसेच, आरोग्य विभागाकडून या महिलांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. बुधवार पेठमध्ये देहविक्रेत्या महिलांच्या मुलांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी शासकीय दूध योजनेतून दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी कात्रज दूध संघाने मदत केली आहे.

नाशिक, अहमदनगर, नागपूर आदी मोठ्या शहरांसोबतच सर्वच जिल्ह्यात या महिलांसाठी रेशन किट वाटप, सॅनिटरी किट वाटप आदी उपक्रम सुरु असून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच या महिलांच्या मुलांसाठी चाईल्डलाईन संस्था काम करत आहेत. काही जिल्ह्यात नोंदणी नसलेल्या छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसायात महिला असून त्यांनाही मदत मिळावी यासाठी महिला आणि बालविकास विभाग अन्य शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. या व्यवसायातील शिधापत्रिका नसलेल्या महिलांनाही शासनाच्या वितरण व्यवस्थेमार्फत रेशन पुरवठा व्हावा यादृष्टीने पाठपुरावा सुरु आहे (Lockdown Effect On Prostitutes).

संबंधित बातम्या :

दुसरा प्रस्ताव दिला, राज्यपाल विचार करतो म्हणाले, आम्ही राजकीय भाष्य करणार नाही : जयंत पाटील

यवतमाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 85 वर, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या वयोवृद्धांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय

साताऱ्यात सॅनिटायझर प्यायल्याने दोघांचा मृत्यू, लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने धीर सुटला

साताऱ्यात कोरोनाचा विळखा वाढला, कराडमध्ये 5 नवे रुग्ण

Published On - 7:43 pm, Tue, 28 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI