AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊनचा इशारा, ‘स्टॉक’ जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ; वाईन शॉपबाहेर रांगा

मद्यप्रेमींनी मात्र काळाची पावले ओळखून 'स्टॉक'ची जमवाजमव सुरु केली आहे. | Lockdown in Maharashtra

मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊनचा इशारा, 'स्टॉक' जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ; वाईन शॉपबाहेर रांगा
लॉकडाऊनची छाया आणखी गडद झाली आहे.
| Updated on: Apr 04, 2021 | 8:05 AM
Share

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे आता लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) जवळपास निश्चित मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना तसे संकेतही दिले होते. हा इशारा आणखी कोणी गंभीरपणे घेतला की माहिती नाही पण मद्यप्रेमींनी मात्र काळाची पावले ओळखून ‘स्टॉक’ची जमवाजमव सुरु केली आहे. (Crowd outside wine shops to buy alcohol stock in Mumbai amid fear of Lockdown)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिवसभरात व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार आणि इतर तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या. या सगळ्यानंतर लॉकडाऊनची छाया आणखी गडद झाली होती. त्यामुळे शनिवारी रात्री नालासोपाऱ्यात ‘वाईन शॉप’बाहेर मोठी गर्दी होताना दिसली. आगामी काही दिवसांत मद्याची रसद कमी पडायला नको म्हणून मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहर रांगा लावल्या होत्या. नालासोपारा पूर्व येथील नगीनदास पाडा परिसरातील हे दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.

एकीकडे वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या नालासोपारा शहरात लोकांनी दारुच्या दुकानाबाहेर तुंबड गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.

मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर अशाप्रकारे गर्दी आणि गोंधळ उडण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. मात्र, यावेळी महाराष्ट्रात कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पण लॉकडाउनच्या भीतीने मद्यप्रेमींनी गेल्यावेळसारखी गत होऊ नये म्हणून अगोदरच स्टॉक खरेदी केला.

‘जिंदगी, जान उसके बाद काम’, नाट्य, चित्रपट क्षेत्रासह, मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा सरकारला पाठिंबा

राज्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 49 हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांचा हा आकडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल) लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसोबत बैठका घेतल्या. यामध्ये चित्रपट, नाट्य क्षेत्रासह मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत चर्चा केली. या चर्चेत सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला.

थिएटर्स चालक-मालकांचे सहकार्य

नितीन दातार म्हणाले, तात्पुरत्या रुग्णालयांसाठी थिएटर्स, त्याठिकाणी असलेली मुबलक जागांमध्ये काही प्रमाणात व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. काही ठिकाणी खूर्च्या काढूनही आवश्यकता वाटल्यास व्यवस्था करता येईल.

कमल गियानचंदानी म्हणाले, शासनाला पूर्ण सहकार्य करू. जनतेच्या राज्याच्या हितासाठी जो कोणता निर्णय घ्याल, त्याला पाठिंबाच राहील.

रोहित शेट्टी म्हणाले, सरकार जो निर्णय घेऊल, त्याच्या सोबत राहू. आपल्या प्रेक्षकांनाही त्रास होतो आहे. एकजुटीने शासनासोबत राहू. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. वेळोवेळी परिस्थितीचे पुनरावलोकनही केले जावे.

यावेळी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते राज्य शासनासोबत असून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले

संबंधित बातम्या:

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचे चार नवे हॉटस्पॉट, सर्वाधिक सक्रीय रुग्ण अंधेरीत, कोणत्या वॉर्डात किती?

‘जिंदगी, जान उसके बाद काम’, नाट्य, चित्रपट क्षेत्रासह, मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा सरकारला पाठिंबा, लॉकडाऊन आता निश्चितच?

Mumbai Lockdown update : निर्बंध शेवटचे, आता मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल : पालकमंत्री

(Crowd outside wine shops to buy alcohol stock in Mumbai amid fear of Lockdown)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.