AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुटीर गटाचे भवितव्य धोक्यात? दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड… लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण…

Operation Tiger Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सेना फुटल्यानंतर आणि फुटीर खासदार शिंदे सेनेत दाखल झाल्यानंतर दिल्लीत मोठी घडामोड घडत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांना भेटीचे आमंत्रण दिले आहे.

फुटीर गटाचे भवितव्य धोक्यात? दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड... लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उद्धव ठाकरे Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 24, 2026 | 11:56 AM
Share

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली. सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली आणि स्वतंत्र गट करत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज दिल्लीत मोठी घडामोड घडत आहे. ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावणे पाठवले आहे. हे दोघेही लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. फुटीर खासदारांच्या गटाला परवानगी न देण्याची विनती ठाकरे गटाने केली होती. याविषयीचे पत्र ज्या दिवशी व्हीप बजावून उद्धव सेनेचे बैठक बोलावण्यात आली होती, त्याच दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले होते. त्यानंतर सहाही खासदारांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला भेटीसाठी (Lok Sabha Speaker Om Birla on Uddhav Thackeray Shiv Sena) बोलावले आहे. या भेटीतून काय समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.

फुटीर गटासमोर अडचणींचा डोंगर?

ऑपरेशन टायगरची राज्यात जोरदार चर्चा सुरू होती. शिंदे सेनेच्या दाव्यानुसार, त्यांनी फुलप्रुफ ऑपरेशन टायगर राबवले सुद्धा. तर ठाकरे गटाने या ऑपरेशनची दखल घेत, लोकसभा अध्यक्षांना फुटीर गटाला मान्यता देण्याच्या अगोदर आमची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. त्यासाठी खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील पक्षाने बोलावलेल्या बैठकीनंतर लागलीच लोकसभा अध्यक्षांचे दालन गाठले होते. त्यांनी फुटीर गटाला मान्यता न देण्याचे पत्र दिले होते.

एक दिवसापूर्वी सहा फुटीर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे सेनेला भेटीसाठी बोलावले आहे. लोकसभेतील ठाकरे सेनेचे गटनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावले आहे. सायंकाळी पाच वाजता या दोघांना भेटीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आज नेमकं काय होतं? उद्धव ठाकरे गट काय बाजू मांडते आणि त्यावर लोकसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी परिशिष्ट 10 आधारे कोणतीही मान्यता देऊ नये अशा प्रकारची मागणी या खासदारांनी अगोदरच केलेली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे तीन सदस्यीय शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. पण त्यांच्या भेटीचे फोटो आणि त्यांनी दिलेले पत्र अद्यापही समोर आलेले नाही, त्यामुळे अजून एक सस्पेन्स वाढल्याचे चित्र आहे. आता ठाकरेंच्या या कॅव्हेटवर लोकसभा अध्यक्षांची भूमिका काय असेल. फुटीर गटाच्या अडचणी वाढतील की ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल हे चित्र संध्याकाळी स्पष्ट होईल. या सर्व घडामोडींवर अद्याप शिंदे गोटातून प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती