चक्रीवादळग्रस्तांसाठी नियमापेक्षा जास्त मदत, घरासाठी 95 हजारांऐवजी दीड लाख, दोन महिने मोफत धान्य

चक्रीवादळग्रस्तांसाठी नियमापेक्षा जास्त मदत, घरासाठी 95 हजारांऐवजी दीड लाख, दोन महिने मोफत धान्य

राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. Maha govt announces Compensation of Nisarga Cyclone

सचिन पाटील

|

Jun 09, 2020 | 9:32 PM

मुंबई : राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या नियमापेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मदत 95 हजार इतकी दिली जात होती.  राज्याते मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली. (Maha govt announces Compensation of Nisarga Cyclone)

राज्य सरकारने NDRF नियमांच्या पलिकडे जाऊन मदत करणे आवश्यक आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. राज्य सरकारने तसाच निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे.

निसर्ग चक्रीवादळाने कोकण अक्षरश: उद्ध्वस्त केलं आहे. लाखो घरं, असंख्य झाडं पडली आहेत. कोकणला पुन्हा उभं करण्यासाठी मोठ्या मदतीची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आता मदत जाहीर केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करुन तातडीने 100 कोटी रुपये जाहीर केले होते. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

कोणाला किती मदत मिळणार?

  • घर पूर्ण नष्ट – दीड लाख रुपये
  • काही प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना 6 हजाराऐवजी 15 हजार मिळणार
  • घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं आहे त्यांना 35 हजार मिळणार
  • NDRF च्या निकषांच्या वरती जो खर्च लागेल तो राज्य सरकार देणार
  • नुकसान झालेल्यांना 10 हजार रोख रक्कम देणार
  • शेतीचं हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला 25 हजाराहून 50 हजार रुपयांची मदत
  • कम्युनिटी किचन सुरु करणार
  • पुढील दोन महिने मोफत धान्य देणार

(Maha govt announces Compensation of Nisarga Cyclone)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें