AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकासआघाडीला दगाफटक्याची भीती; हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच पार पडणार?

महाविकासआघाडीला आमदार फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे गुप्त मतदान पद्धतीऐवजी हात उंचावून मतदानाचा कायदा विधानपरिषदेत पारित झाल्यानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. मात्र, यामध्ये विरोधक कितपत सहकार्य करणार, हे पाहावे लागेल.

महाविकासआघाडीला दगाफटक्याची भीती; हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच पार पडणार?
हिवाळी अधिवेशन
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 7:39 AM
Share

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी अधिवेशन अध्यक्षांविनाच पार पडण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना आणि मर्यादित कालावधीचे कारण देत अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात तरी नव्या अध्यक्षाची निवड होईल, अशी चर्चा होती.

मात्र, महाविकासआघाडीला आमदार फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे गुप्त मतदान पद्धतीऐवजी हात उंचावून मतदानाचा कायदा विधानपरिषदेत पारित झाल्यानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. मात्र, यामध्ये विरोधक कितपत सहकार्य करणार, हे पाहावे लागेल. अन्यथा यंदाचे हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच पार पडण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने विधानसभेचा नवा अध्यक्ष कोण, ही चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आमदारांच्या PA ला प्रवेश नाही, प्रेक्षकांना नो एन्ट्री

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात 7 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात आली आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.

डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य

याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली.

एक आसन सोडून सदस्यांना बसणं अनिवार्य, प्रेक्षकांना नो एन्ट्री

कोरोना पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी प्रेक्षकांना कामकाज पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.

हे ही वाचा :

हिवाळी अधिवेशन : 2 डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य, आमदारांच्या PA ला प्रवेश नाही, प्रेक्षकांना नो एन्ट्री!

तिकीट कापायचा पॅटर्न ठरला; फडणवीस गडकरींच्या बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची झोप उडाली!

विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकीचे इंधन महाग, काँग्रेस राजवटीत आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात? : राऊत

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.