लसवंत महाराष्ट्र, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर, लसीकरणात राज्याचा विक्रम

महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला.

लसवंत महाराष्ट्र, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर, लसीकरणात राज्याचा विक्रम
कोरोना लसीकरण

मुंबई: कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे.

लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

पुढील महिन्यात लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होणार

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाची लस येत्या ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या कंपनीने गेल्या 1 जुलैला याबाबतची माहिती दिली होती. झायडस कॅडिलानं 12 ते 18 वर्षे वयोगटातील डीएनएवर आधारित असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लस ZyCoV-D ची निर्मिती केली आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायल नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुढील 45 ते 60 दिवसात ZyCoV-D लस उपलब्ध होईल. ही लस भारतीय औषध महानियंत्रकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झायडस कॅडिलानं 12 ते 18 वर्षे वयोगटातील लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या लसीला लवकरच परवानगी दिली जाणार आहे. त्यानुसार 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होईल.

अल्पवयीन मुलाकडून कोर्टात याचिका

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. यानंतर आता सरकारकडून कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही तयारी केली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ही अतिधोकादायक असून त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी लवकरात लवकर कोरोना लसीकरण सुरु करा अशी मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस कधी मिळणार असा सवाल करत थेट याचिका दाखल केली होती. या याचिकेला केंद्र सरकारने एका शपथपत्राच्या सहाय्याने उत्तर दिले आहे.

इतर बातम्या:

Mumbai Vaccination | मुंबई BKC केंद्रावर गेल्या आठवड्यापासून लसीकरणासाठी लांबच लांब रांग

Aurangabad | औरंगाबादेत लसीकरण पुन्हा केंद्रावर गोंधळ, लसतुटवड्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी

(Maharashtra becomes the first state to have over 1 crore people vaccinated with both doses of Corona vaccine)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI