महाराष्ट्र भूषण सोहळ्याला गालबोट; उष्माघातामुळे 8 जणांचा मृत्यू; विरोधकांची टीका

उष्माघातामुळे घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी या घटनेला सरकार जबाबदार असून या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

महाराष्ट्र भूषण सोहळ्याला गालबोट; उष्माघातामुळे 8 जणांचा मृत्यू; विरोधकांची टीका
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 11:38 PM

नवी मुंबई :  आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्मघातामुळे 50 च्यावर सदस्यांना त्रास झाला आहे. तर यामध्ये  7 ते 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर हआणखी 24 जणांवर नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.  आज रात्री साडे नऊ च्या सुमारास स्वतः  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात येऊन उपचार घेत असलेल्या सदस्यांची विचारपूस करून, सर्व उपचार घेत असल्याचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती दिली.

तसेच उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी दवाखान्यात नियुक्त करण्यात आला आहे.तसेच मृत्यूच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केल्यानंतर आज या पुरस्काराचा वितरण सोहळा नवी मुंबईच्या खारघरमध्ये  आयोजित करण्यात आला होता.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सकाळी 10 ते 3 या वेळात हा पुरस्कार सोहळा साजरा झाला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम भर उन्हात झाल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेकांना उष्मघाताचा त्रास झाला आहे.

उष्मघाताने त्रस्त झालेल्या सदस्यांना नवी मुंबई कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, टाटा रुग्णालय, नवी मबाई महापालिका रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय यासह अन्य रुग्णालयात दाखल करून उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

तर सध्या आणखी एमजीएम रुग्णालयातील 4 जण हे अतिदक्षता विभागात तर 20 जण जनरलवर्ड मध्ये उपचार घेत आहेत तर अतिदक्षता विभागातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची सूत्रांची माहिती आहे.

उष्माघातामुळे घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी या घटनेला सरकार जबाबदार असून या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.