AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात मोठी वाढ…; राज्य सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Budget Session 2024-2025 : अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अजित पवार विविध घोषणा करत आहेत. यावेळी सामुहिक विवाहाच्या अनुदानाविषयी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. याशिवाय अन्य बाबींचा या अर्थसंकल्पात समावेश आहे. वाचा सविस्तर....

सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात मोठी वाढ...; राज्य सरकारची मोठी घोषणा
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Vidhansabha
| Updated on: Jun 28, 2024 | 2:49 PM
Share

राज्य सरकारने सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात मोठी वाढ केली आहे. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान १० हजार होते. ते आता २५ हजार केलं आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात ७८ हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ. हर घर नल, हर घर जलसाठी १ कोटी २५ लाख ६६ लाख घरांना नळजोडणी दिली आहे. राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे, अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेला. यावेळी अजित पवारांनी ही घोषणा केली आहे.

तरूणांसाठी विशेष योजना

शैक्षणिक संस्थातून ११ लाख विद्यार्थी पदवी घेतात. डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थींची संख्या मोठी आहे. त्यांना औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळणार. दरवर्षी १० लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना राबवणार. दरवर्षी १० हजार रुपये देण्यात येईल. त्यासाठी १० कोटीची तरतूद करण्यात येईल. दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिलं जाणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

शेतकऱ्यासाठीची योजना

ई- पंचनामा योजना राज्यभरात राबवण्यात येणार आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर माल साठवणुकीसाठी गाव तिथे गोदाम योजना राबवणार. १०० गोदामांची दुरुस्ती करणार आहे. कापूस आणि सोयाबीन पिकाचा राज्याच्या उत्पन्नात वाटा आहे. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नुकसान सोसावं लागलं होतं. आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागेच कॅबिनेटने निर्णय घेतला होता. पण आचारसंहिता लागली होती. आता कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार देणार आहे, असं म्हणत अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा केली आहे.

कांदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी तयार केला जाणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावीसाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहेत, असंही अजित पवार म्हणालेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.