AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget women : महिलांचे नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, 12 वीपर्यंत मुलींना मोफत प्रवास

अजित पवार यांनी महिलांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेचा समावेश आहे.

Maharashtra Budget women : महिलांचे नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, 12 वीपर्यंत मुलींना मोफत प्रवास
Ajit Pawar
| Updated on: Mar 08, 2021 | 3:23 PM
Share

मुंबई : जागतिक महिला दिनी सादर होत असलेल्या महाविकास आघाडी सरकाच्या अर्थसंकल्पावेळी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. पण आता अजित पवार यांनी महिलांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेचा समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठीही महत्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.(Finance Minister Ajit Pawar made several big announcements for women)

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना

आपल्या हक्काच्या घरावर महिलांचं नाव असणं हा महिलांच्या सशक्तीकरणाचाच एक भाग आहे. एका महिलेमुळे ज्या घराला घरपण येतं. त्या घरावर तिचं नाव असावं, ही माझ्या माय-बहिणींची अपेक्षा अवाजवी नाही. अजित पवार यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली. कोणतेही कुटुंब यापुढे राज्यात घर खरेदी खरेदी करेल, ते घर महिलांच्या नावे करण्यातं आलं तर मुद्रांक शुल्कात 1 टक्का सूट देण्यात येईल, असं अजितदादा यांनी सांगितलं आहे. या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2021 पासून होणार आहे. या योजनेमुळे शासनाचा 1 हजार कोटी रुपयांचा महसूल बुडण्याची शक्यता आहे.

12 वी पर्यंत विद्यार्थिनींना मोफत प्रवास

मुलींच्या शिक्षणासाठी राज्यात अनेक प्रागतिक पावलं उचलण्यात आली आहेत. मुलींचं 12 वी पर्यंतचं शिक्षण मोफत करण्यात आलं आहे. आता राज्यातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आपल्या गावातून शाळा, महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाद्वारे राज्यव्यापी योजनेची घोषणा केली. ही योजने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाला 1 हजार 500 सीएनजी आणि हायब्रिड बस प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी तेजस्विनी बस योजने अंतर्गत अजून काही बसेस उपलब्ध करुन देण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे.

महिला व बालविकास विभागासाठी मोठी तरतूद

अजित पवार यांनी महिलांसाठी अन्य महत्वाच्या घोषणाही केल्या आहेत. त्यात महिला आणि बालविकास विभागाला 2 हजार 247 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राकडून महिला आणि बालविकास विभागाला 1 हजार 398 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

घरकाम करणाऱ्या महिलांसाठीही खास योजना

त्याचबरोबर कोरोना काळात मोठा फटका बसलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांसाठीही अजित पवार यांनी एका योजनेची घोषणा केलीय. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना या नावाने ती ओळखली जाणार आहे. या योजनेसाठी समर्पित कल्याण निधी उभारण्यात येणार आहे. तर राज्य सरकारकडून या योजनेसाठी 250 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. इतकच नाही तर जागतिक महिला दिनानिमित्त अजित पावर यांनी राज्य राखीव पोलिस दलात महिलांची एक स्वतंत्र तुकडी निर्माण करण्याचीही घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Budget 2021 Ajit Pawar full speech : महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प

कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करा, भाजप नेत्याची मागणी

Finance Minister Ajit Pawar made several big announcements for women

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.