AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचं नाव आता ‘राजगड’, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 26 निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी महत्त्वाचा म्हणजे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला आता राजगड म्हणून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वात मोठी बातमी, पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्याचं नाव आता 'राजगड', मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 13, 2024 | 3:35 PM
Share

मुंबई | 13 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 26 निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी महत्त्वाचा म्हणजे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला आता राजगड म्हणून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आलाय. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली.

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करुन घेणे, पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करुन घेणे, पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.

राज्याचे विरोधी पक्षनेते असताना 27 एप्रिल 2023 ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी वेळोवेळी केलेली मागणी आज त्यांच्याच उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे. याचा वेल्हे तालुका, पुणे जिल्हा आणि समस्त महाराष्ट्रवासियांना अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा निर्णय घेण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे, जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

  1. मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर ( मराठी भाषा विभाग)
  2. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार ( गृह विभाग)
  3. अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता ( सामान्य प्रशासन विभाग)
  4. केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता ( नगरविकास विभाग)
  5. श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार ( सार्वजनिक बांधकाम विभाग)
  6. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प ( मदत व पुनर्वसन)
  7. भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज ( वित्त विभाग)
  8. राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ ( आरोग्य विभाग)
  9. महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार ( दुग्धविकास विभाग)
  10. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार ( जलसंपदा विभाग)
  11. मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार ( जलसंधारण विभाग)
  12. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना. ( महिला व बालविकास)
  13. मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले. (वैद्यकीय शिक्षण)
  14. आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार. ( कौशल्य विकास)
  15. कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
  16. ( ऊर्जा विभाग)
  17. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता ( ऊर्जा विभाग)
  18. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार (पशुसंवर्धन व दुग्धविकास)
  19. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता ( महसूल विभाग)
  20. म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
  21. आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ ( सार्वजनिक आरोग्य विभाग)
  22. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार ( परिवहन विभाग)
  23. मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता ( नगरविकास विभाग)
  24. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते ( ग्रामविकास विभाग)
  25. भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
  26. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन ( महसूल व वन विभाग)
  27. जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता ( परिवहन विभाग)
  28. दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना ( पशुसंवर्धन व दुग्धविकास)

Follow Us
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच