State Cabinet Meeting : वैद्यकीय महाविद्यालय, आदर्श शाळा बांधकामांबाबत महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालये आणि आदर्श शाळांच्या बांधाकामांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

State Cabinet Meeting : वैद्यकीय महाविद्यालय, आदर्श शाळा बांधकामांबाबत महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळ बैठक

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालये आणि आदर्श शाळांच्या बांधाकामांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले? पाहूया (Maharashtra cabinet meeting decision today taken by CM Uddhav Thackeray DCM Ajit Pawar)

>> शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण निश्चित

(वैद्यकीय शिक्षण विभाग)

>> भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजीव गांधी आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय

(शालेय शिक्षण विभाग)

>> आदर्श शाळा बांधकामाबाबत निर्णय

(शालेय शिक्षण विभाग)

>> भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा निर्णय

(सांस्कृतिक कार्य विभाग)

>> आयपीसीसी या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने ऑगस्ट २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण

(पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग)

वैद्यकीय महाविद्यालयांबाबत निर्णय, देशमुखांची प्रतिक्रिया

कॅबिनेटमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत खासगी योजनेला मान्यता दिली. येणाऱ्या काळात बदल होतील. राज्यात 18 जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत. 8 ठिकाणी महाविद्यालय आणि रुग्णालय प्रगतीफथावर आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जिथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू झालेली नाहीत तिथे फायदा होईल, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. खासगी संस्था आणि विद्यालय चालवणाऱ्यांना सोबत घेऊ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी गरज निर्माण झाली आहे ती पूर्ण होईल. वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरता येतील. त्याचबरोबर शहरीकरण आणि मॉडर्नायझेशन करणं शक्य होईल, असंही देशमुख म्हणाले.

महाविद्यालय सुरु करणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करणे असा सरकारचा मानस आहे. राज्य सरकारचे सर्व प्रकल्प असतील. शिक्षणाचा दर्जा, वैद्यकीय सेवा जलदगतीनं लोकांपर्यंत पोहचावी हा मुख्य हेतू असेल. वैद्यकीय सुविधा जिथे कार्यान्वित आहेत, तिथे गरज नाही. सुपरस्पेशालिटी उपलब्ध करायची गरज असेल तर करु. आरोग्य सुविधा जिल्हा जिल्ह्यात तातडीने खासगी भागिदार तत्वावर उपलब्ध करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर शुल्कार फरक पडणार नसल्याचंही देशमुख म्हणाले.

इतर बातम्या :  

12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा आज सुटण्याची आशा, मुख्यमंत्री-राज्यपालांच्या भेटीची वेळ ठरली!

2021 पासून शिवसेनेची घोषणा ‘पहले मदिरायल बाद में मंदिर’, शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra cabinet meeting decision today taken by CM Uddhav Thackeray DCM Ajit Pawar

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI