AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे कोणती खाती? अजित पवार यांच्या वाटेला काय आले?

Maharashtra Portfolio Allocation : गेल्या पाच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते कायम आहे. या खात्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्याचा फायदा त्यांना शिवसेनेत बंड करताना झाला होता. गृहविभाग सोडला तर गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास ही महत्वाची खाती शिंदे यांना मिळाली आहे. 

Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे कोणती खाती? अजित पवार यांच्या वाटेला काय आले?
फडणवीस मंत्रिमंडळात खातेवाटप
| Updated on: Dec 22, 2024 | 1:33 PM
Share

Shiv Sena Portfolio Distribution : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार विधानसभा निवडणूक निकालानंतर अखेर महिन्याभराने झाला. या विस्तारात एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही महत्वाची खाती आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे अर्थ, राज्य उत्पादन शुल्क हे खाती आली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही किरकोळ बदल वगळता मागील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असणारी खाती दिली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते कायम आहे. या खात्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्याचा फायदा त्यांना शिवसेनेत बंड करताना झाला होता. गृहविभाग सोडला तर गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास ही महत्वाची खाती शिंदे यांना मिळाली आहे. गृहनिर्माण सारखे पॉवरफुल खाते एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून आपल्याकडे घेतले आहे. यापूर्वी हे खाते शिंदे सरकारमध्ये भाजपच्या अतुल सावे यांच्याकडे होते.

शिवसेनेकडे कोणती खाती

  • एकनाथ शिंदें- नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
  • उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
  • प्रताप सरनाईक – वाहतूक
  • शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
  • भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास
  • प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • दादा भुसे – शालेय शिक्षण
  • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  • संजय राठोड – मृदा व जलसंधारण
  • संजय शिरसाट – सामाजिक न्याय

शिवसेनेचे राज्यमंत्री

  • योगश कदम – ग्रामविकास, पंचायत राज
  • आशिष जैस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला काय आले?

  • उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन शुल्क
  • हसन मुश्रीफ -वैद्यकीय शिक्षण
  • अदिती तटकरे -महिला व बालकल्याण
  • धनंजय मुंडे – अन्न नागरी पुरवठा खाते
  • बाबासाहेब पाटील – सहकार
  • मकरंद पाटील – मदत व पुनर्वस खाते
  • दत्ता मामा भरणे -क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक
  • कृषी – माणिकराव कोकाटे
  • अन्न व औषध प्रशासन – नरहरी झिरवाळ

भाजपकडे कोणती खाती?

  • देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री, गृह, ऊर्जा (वगळून अक्षय ऊर्जा), कायदा आणि न्यायव्यवस्था, सामान्य प्रशासन विभाग, माहिती आणि प्रसिद्धी (आणि इतर कोणत्याही मंत्र्याला वाटप न केलेले विभाग/विषय)
  • चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
  • राधाकृष्ण विखे-पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
  • चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज
  • गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन
  • गणेश नाईक – वन खातं
  • मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम
  • जयकुमार रावल – पणन आणि राजशिष्टाचार
  • पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन
  • अतुल सावे – ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि अक्षय ऊर्जा
  • अशोक उईके – आदिवासी विकास
  • आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
  • शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  • जयकुमार गोरे – ग्रामविकास आणि पंचायती राज
  • संजय सावकारे – वस्त्रोद्योग
  • नितेश राणे – मत्स्यव्यवसाय, बंदरे
  • आकाश फुंडकर – कामगार
  • माधुरी मिसाळ (राज्यमंत्री) – नगरविकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ
  • पंकज भोयर (राज्यमंत्री) – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खाणकाम
  • मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री) – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.