CM Uddhav Thackeray Covid19 Vaccine | मुख्यमंत्र्यांसोबत सासूबाईही जेजेत, ठाकरे कुटुंबातून कोणी-कोणी लस घेतली?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोना प्रतिबंधक लस (CM Uddhav Thackeray Take Covid-19 Vaccine) घेतली.

CM Uddhav Thackeray Covid19 Vaccine | मुख्यमंत्र्यांसोबत सासूबाईही जेजेत, ठाकरे कुटुंबातून कोणी-कोणी लस घेतली?
Uddhav Thackeray COVID-19 Vaccination
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 2:02 PM

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोना प्रतिबंधक लस (CM Uddhav Thackeray Take Covid-19 Vaccine) घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेतला आहे. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविशिल्ड लस घेतली होती (Maharashtra CM Uddhav Thackeray Take Covid-19 Vaccine Along With Wife Rashmi Thackeray And Mother In Law).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब जे. जे. रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, रश्मी ठाकरे मातोश्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

लस टोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जवळपास अर्धा तास रुग्णालयातच देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री लस घेतानाचा फोटो

मुख्यमंत्र्यासह कोणी-कोणी लस घेतली?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे. जे. रुग्णालयात लस घेतली. तसेच, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही यावेळी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोरोना लस घेतली.

आदित्य ठाकरेंनी लस घेतली नाही

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत जे. जे. रुग्णालयात पोहोचले. मात्र, यावेळी त्यांनी कोरोनाची लस घेतली नाही.

“कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही”

कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही. लस घेताना कळत नाहीत. कोरोनाचा धोका परत वाढतो. त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.

कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. लसीकरण करुन घ्या. बाहेरचं अनावश्यक जाणं टाळा. आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. नाईलाजाने परत कडक लॉकडाऊन करावा लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?

कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.

लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस नाही.

Maharashtra CM Uddhav Thackeray Take Covid-19 Vaccine Along With Wife Rashmi Thackeray And Mother In Law

संबंधित बातम्या :

Covid19 vaccination in Maharashtra : शरद पवारांनीही कोरोना लस घेतली, महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.