Maharashtra Corona Update : ‘लसीकरण केंद्र वाढवा, छोट्या रुग्णालयांनाही परवानगी द्या’, राज्याची केंद्राला विनंती

केंद्र सरकारने महाराष्ट्राला दर आठवड्याला 20 लाख डोस देणं अपेक्षित आहे. आता आपल्याकडे फक्त 10 दिवसांचा स्टॉक शिल्लक असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

Maharashtra Corona Update : 'लसीकरण केंद्र वाढवा, छोट्या रुग्णालयांनाही परवानगी द्या', राज्याची केंद्राला विनंती
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 3:55 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशावेळी लसीकरणाची गती वाढवण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच केंद्र सरकारने महाराष्ट्राला दर आठवड्याला 20 लाख डोस देणं अपेक्षित आहे. आता आपल्याकडे फक्त 10 दिवसांचा स्टॉक शिल्लक असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनाही कल्पना दिल्याचं टोपे म्हणाले.(Maharashtra government demands to increase corona vaccination center and give 20 lakh doses per week)

‘100 बेडच्या रुग्णालयाची जाचक अट रद्द करा’

राज्य सरकारने केंद्राकडे 367 लसीकरण केंद्राची मागणी केली आहे. पैकी 209 केंद्रालाची परवानगी देण्यात आली आहे. अशावेळी उर्वरीत केंद्रांनाही केंद्रानं परवानगी देणं गरजेचं असल्याचं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. दरम्यान, सरकारनं लसीकरण केंद्रासाठी 100 बेडच्या रुग्णालयाची जी जाचक अट घातली आहे, ती रद्द करावी. 50 बेड किंवा 25 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयांनाही परवानगी मिळावी. ज्या ठिकाणी लस साठवून ठेवण्याची यंत्रणा, कोल्ड स्टोरेज असेल अशा रुग्णालयांना परवानगी मिळावी, अशी मागणी केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

‘भारत बायोटेकचं तंत्रज्ञान हाफकिनलाही मिळावं’

राज्य सरकारने केंद्राकडे अजून एक महत्वाची मागणी केली आहे. त्यात भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान महाराष्ट्राला देण्यात यावं. महाराष्ट्र सरकार त्याचा वापर करुन हाफकिनकडून लस निर्मिती करेल. अथवा महाराष्ट्र सरकारच्या सर्व संसाधनांचा वापर करुन केंद्रानं सर्व पुरवठा करावा, आम्ही फक्त ‘फिल अॅन्ड फिनिश’ करुन ते केंद्राला देण्यात येईल. या मागणीला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. ही मागणी मान्य झाल्यास या द्वारे जे उत्पादन होईल त्यातील 25 टक्के वाटा महाराष्ट्राला देण्याची अट घातली जाईल, असंही टोपे म्हणाले.

जावडेकरांवर आरोप नाही – टोपे

केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी होत असल्याचा आक्षेप आम्ही घेतला नाही. प्रकाश जावडेकरांवर आमचा आरोप नाही. लसीकरणाची गती वाढवल्यामुळे आठवड्याला 20 लाख डोस आम्हाला लागणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला 54 लाख कोरोना लसीचे डोस दिले. मग आतापर्यंत फक्त 23 लाख ससीचंचं लसीकरण का करण्यातं आलं? असा जवाल विचारला होता.

85 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नसल्यानं अडचणी

महाराष्ट्रातील मृत्यूदर 0.4 टक्क्यांवर आला आहे. या परिस्थितीला आम्ही एकाग्रतेने सामोरे जात आहोत. 85 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नसल्यानं अनेक अडचणी निर्माण होत आहेत. राज्यात 1 लाख 38 हजार चाचण्या रोज होत आहेत. टेस्टची संख्या वाढवू, लॅब्स वाढवू, आरटीपीसीआर टेस्टिंग वाढवू, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 45 वर्षांवरील सर्वांनाच सरसकट लस देण्याची सूचना केंद्र सरकारला केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Palghar corona update : पालघरमध्ये कोरोनाचा विस्फोट, आश्रमशाळेतील 30 विद्यार्थी पॉझिटिव्ह

Mumbai lockdown Update : मुंबईत लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लावणार, पालकमंत्र्यांची मोठी घोषणा

54 लाख लस दिल्या, मग आतापर्यंत 23 लाख लसच का टोचल्या?; लसीकरणावरून जावडेकरांचा महाराष्ट्र सरकारला ‘डोस’

Maharashtra government demands to increase corona vaccination center and give 20 lakh doses per week

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.