AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar corona update : पालघरमध्ये कोरोनाचा विस्फोट, आश्रमशाळेतील 30 विद्यार्थी पॉझिटिव्ह

नंडोरे आश्रम शाळेतील 30 विद्यार्थ्यांना गेल्या दोन तीन दिवसात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. Palghar news school students tested corona

Palghar corona update : पालघरमध्ये कोरोनाचा विस्फोट, आश्रमशाळेतील 30 विद्यार्थी पॉझिटिव्ह
पालघरमध्ये 30 विद्यार्थ्यांना कोरोना
| Updated on: Mar 17, 2021 | 2:36 PM
Share

पालघर: जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील हिरड पाडा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची बाब समोर आल्यानंतर आता पालघर शहराजवळील नंडोरे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 30 विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ही बाधा झाल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य प्रशासन धावपळ करताना दिसत आहे. (Maharashtra Palghar news school students tested corona positive worst situation covid19 in Palghar district)

30 विद्यार्थ्यांना कोरोना

नंडोरे आश्रम शाळेतील 30 विद्यार्थ्यांना गेल्या दोन तीन दिवसात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या शाळेतील एका शिक्षकालाही कोरोना झालेला आहे. सुरुवातीला या शाळेतील तीन विद्यार्थिनींना लक्षणे आढळल्यामुळे त्यांची तपासणी केली असता त्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आश्रम शाळेतील 193 विद्यार्थी व 34 शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 30 विद्यार्थी व एक शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत. आश्रमशाळेत 9 वी ते 12 वी पर्यंत 162 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर 34 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिकवत आहेत.

आश्रमशाळेला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आलंय

कोरोनाची लागण झालेल्या व लक्षणे असलेल्या नऊ विद्यार्थिनींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ ठेवण्यात आले आहे. तर इतर लक्षणे नसलेल्या विद्यार्थ्यांना नंडोरे आश्रम शाळेतच विलगीकरण कक्ष उभारून वैद्यकीय चमूच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी दिली आहे. आश्रम शाळेमध्ये वैद्यकीय पथकाने पाहणी केली असून आश्रम शाळा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.

पालकांचा आश्रमशाळेला घेराव

विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्यांचे काही पालक आश्रम शाळेला घेराव घालून होते व  त्यांनी गोंधळ घातला होता. मात्र, त्यानंतर तहसीलदार सुनील शिंदे यांनी पालकांना विश्वासात घेऊन संबंधित विद्यार्थ्यांची योग्य ती निगा व काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर येथील वातावरण शांत झाले.

संबंधित बातम्या:

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा

कोरोनाला रोखण्याचे आव्हान, प्राण्यांनाही संसर्ग होत असल्याने खळबळ

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्या : चंद्रकांत खैरे

Maharashtra Palghar news school students tested corona positive worst situation covid19 in Palghar district

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.