AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाला रोखण्याचे आव्हान, प्राण्यांनाही संसर्ग होत असल्याने खळबळ

कोरोना विषाणू प्राण्यांवरसुद्धा हल्ला करत असल्याचे समोर येत आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. (lion corona positive spain)

कोरोनाला रोखण्याचे आव्हान, प्राण्यांनाही संसर्ग होत असल्याने खळबळ
| Updated on: Dec 09, 2020 | 4:09 PM
Share

माद्रिद :  कोरोना महामारीमुळे लाखो लोकांना आपला प्राण गमावावा लागला. या पार्श्वभूमीवर जगातील कित्येक देशांमध्ये कारोनावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, कोरोना संसर्गाविषयी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. (lions found corona positive in spain)

हा विषाणू प्राण्यांवरसुद्धा हल्ला करत असल्याचे समोर येत आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. स्पेनमधील एका प्राणीसंग्रहालयात चार सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खबळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनमधील प्राणीसंग्रहालयात चार सिंहांची प्रकृती बिघडल्याचे सिंहांची देखभाल करणाऱ्या नोकराच्या लक्षात आले. नोकराने ही बाब त्याच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर या चारही सिंहांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. या चार सिंहांपैकी तीन नर आहेत, तर एक मादी आहे. नर सिंहाचे वय चार वर्षे असल्याची माहिती आहे. (lions found corona positive in spain)

सिंहांची कोरोना टेस्ट कशी झाली?

दरम्यान, सिंहाना कोरोना सदृश लक्षणं आढळल्यानेच त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. माणसांची जशी कोरोना चाचणी केली जाते, अगदी तशाच पद्धतीने सिंहांचीही कोरोना चाचणी केली गेली. त्यांनंतर एकूण चार सिंहाना कोरोना झाल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवासांपूर्वी प्राणिसंग्रहालयात काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाची लागण झाली होती. या कामगारांच्या मार्फत सिंहांना कोरनाचे संक्रमण झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शंकेवर विश्वास न ठेवता सिंहांना कोरोना विषाणूचा संसर्ग कशामुळे झाला?, त्याची कारणं काय आहेत?, या सर्वांची शास्त्रीय पद्धतीने चौकशी केली जाणार आहे.

या आधीही सिंहांना कोरोनाची लागण

या पूर्वीही प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स नावाच्या प्राणीसंग्रहालयात चार वाघ आणि तीन सिंहांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बार्सिलोनाच्या पशुचिकित्सकांनी त्यांच्यावर उपचार केले होते. योग्य उपचारामुळे सर्व वाघ आणि सिंह कोरोनामुक्त झाले होते.

दरम्यान, कोरनाच्या संसर्गामुळे माणसं तर हवालदिल आहेत. मात्र, आता प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने चिंता वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. (lions found corona positive in spain)

संबंधित बातम्या :

भारताविरोधात चीनच्या वाढत्या कुरापती, सीमेजवळ सैन्यतळ उभारणी सुरु

वुहान: ज्या शहरातून कोरोना संसर्ग झाला तिथे एका वर्षानंतर काय चाललेय?

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.