Mumbai Corona | मुंबईत 798 कंटेन्मेंट झोन, साडेनऊ लाख घरे असलेले परिसर सील

संपूर्ण मुंबईतील 42 लाख 18 हजार 818 इतकी लोकसंख्या असलेल्या आणि 9 लाख 50 हजार 578 घरे असलेल्या 798 परिसरांना सील करण्यात आले आहे. (Corona Containment Zones in Mumbai)

Mumbai Corona | मुंबईत 798 कंटेन्मेंट झोन, साडेनऊ लाख घरे असलेले परिसर सील
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 10:21 AM

मुंबई : मुंबईत आतापर्यंत 798 कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. या कंटेन्मेंट झोनमध्ये जवळपास एकूण 19 हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. (Corona Containment Zones in Mumbai)

‘कोरोना’बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या परिसराला महापालिकेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले जाते. मुंबईत एकूण 798 भागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

संपूर्ण मुंबईत सध्या ‘कोरोना’ रुग्ण आढळून आलेल्या साडेचार हजार इमारती सील करण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतींमध्ये एकूण अंदाजे दहा हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा : मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…

संपूर्ण मुंबईतील 42 लाख 18 हजार 818 इतकी लोकसंख्या असलेल्या आणि 9 लाख 50 हजार 578 घरे असलेल्या 798 परिसरांना सील करण्यात आले आहे. या बाधित क्षेत्रांमध्ये 18 हजार 957 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

दहिसर असलेल्या आर-उत्तर विभागात सर्वाधिक 116, तर कुर्ला असलेल्या एल विभागात 115 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. तर सर्वात कमी प्रतिबंधित क्षेत्र ग्रँट रोड, मलबार हिल या ‘डी’ विभागात आहेत. या भागात 9 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

10 जूनपर्यंतची दिलासादायक आकडेवारी :

1. मुंबईचा डबलिंग रेट 24.5 दिवस. (राष्ट्रीय सरासरी 16 दिवस) 2. मृत्यू दर कमी होऊन 3% झाला आहे (जवळपास राष्ट्रीय सरासरीइतके) 3. डिस्चार्ज रेट: 44%  (Corona Containment Zones in Mumbai) 4. धारावीतील डबलिंग रेट: 42 दिवस (स्रोत : मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्वीट)

(Corona Containment Zones in Mumbai)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.