AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai lockdown Update : मुंबईत लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लावणार, पालकमंत्र्यांची मोठी घोषणा

मंगळवारची आकडेवारी पाहिली तर मुंबईत 1 हजार 922 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. असं असलं तरी मुंबईतील स्थिती बिकट नसल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय.

Mumbai lockdown Update : मुंबईत लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लावणार, पालकमंत्र्यांची मोठी घोषणा
| Updated on: Mar 17, 2021 | 2:27 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. मुंबईतही कोरोना प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. मंगळवारची आकडेवारी पाहिली तर मुंबईत 1 हजार 922 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. असं असलं तरी मुंबईतील स्थिती बिकट नसल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय. पण कठोर निर्बंध लावले जाणार असल्याचे संकेतही शेख यांनी दिले आहेत.(Mumbai is not in a dire situation of lockdown – Aslam Sheikh)

अस्लम शेख यांनी आज मालाडमधील तुंगा हॉस्पिटलला भेट दिली. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लसीकरणाबाबत अजूनही थोडे संभ्रम आहेत. आपण लसीकरणाबाबत घाबरुन न जाता डॉक्टरांना योग्य प्रतिसाद देण्याची गरज असल्याचं शेख म्हणाले. तसंच लसीकरणाचा कार्यक्रम योग्य पद्धतीनं सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना मुंबईची स्थिती बिकट बनलेली नाही. मात्र, अजून कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊन लावण्यापासून दूर राहू शकतो, असं पालकमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळे मुंबईत अजून कठोर निर्बंध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईतील कोरोनाची स्थिती काय?

मुंबई मंगळवारी 1 हजार 922 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 236 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. मृत झालेल्या रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 2 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या एकूण 15 हजार 263 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारची आकडेवारी पाहिली तर मुंबईत 1 हजार 712 नवे रुग्ण आढळून आले होते.

मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. 9 मार्च ते 15 मार्चपर्यंत मुंबईत एकूण कोविड वाढीचा दर 0.45 टक्के राहिला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 156 दिवस असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

संबंधित बातम्या : 

नियम पाळा अन्यथा कारवाईला तयार रहा, नगरच्या गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच!

Mumbai pune Corona Report : मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, पुण्याच्या विभागीय आयुक्तांनाही कोरोना

Mumbai is not in a dire situation of lockdown – Aslam Sheikh

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.